Virat Resigns : BCCIमधील 'शाहजाद्यां'मुळे विराटचा राजीनामा; महाविकास आघाडीतील 'या' मंत्र्यांचा गंभीर आरोप

Maharashtra Power Minister Reaction on Virat Kohali : भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) कसोटी मालिका गमावली. भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा (Team India) कसोटी कर्णधार (Test captain) विराट कोहलीने (Virat Kohli) अचानक पदाचा राजीनामा (Resigned) दिला.

Virat Kohali resign
विराट कोहली  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयमधील काही लोक आणि त्यांचे राजकारण जबाबदार असल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.
  • ट्विट करुन राज्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विराट कोहलीच्या राजीनाम्यावरुन जय शाहवर निशाणा साधला.
  • विराट कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.


Nitin Raut Reaction on Virat Kohali resign:  मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) कसोटी मालिका गमावली. भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा (Team India) कसोटी कर्णधार (Test captain) विराट कोहलीने (Virat Kohli) अचानक पदाचा राजीनामा (Resigned) दिला. कोहलीच्या या राजीनाम्यामुळे क्रिडा विश्वात मोठी खळबळ माजली आहे. 

दरम्यान गेल्या काही महिन्यात विराटने टी-20 आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले तर वनडे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले.भारतीय क्रिकेट संघातील या घडामोडींवर सर्वजण प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोहलीच्या या निर्णयाची चर्चा सध्या रंगत आहे. दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेते मंडळी देखील या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्री डॉ.नितीन राऊत यांनीही कोहलीच्या राजीनाम्याविषयी मोठी प्रतिक्रिया देत त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न देखील राऊत यांनी केला आहे. 

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे.  विराटच्या राजीनाम्यावर राऊत म्हणतात की, भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की, क्रिकेट बोर्डातील "शाहजाद्यांचं" राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता.

विराटच्या राजीनाम्यामागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमधील काही लोक आणि त्यांचे राजकारण जबाबदार असल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. त्याच्या या ट्विटवर युझर्स देखील प्रतिक्रिया देत आहे. पण त्यातील अनेक प्रतिक्रिया या राजकीय स्वरुपच्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-1 ने गमावली. त्या पाठोपाठ विराटने राजीनामा दिला. याआधी विरटाने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. यावर बराच मोठा वाद झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी