२०१४मध्ये डिप्रेशनमध्ये होता विराट, म्हणाला...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 19, 2021 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ७० शतके ठोकणारा विराट कोहलीने सांगितले की आयुष्यात साथ देणारे लोक होते मात्र तरीही त्याला एकटे वाटत होते. 

virat kohli
२०१४मध्ये डिप्रेशनमध्ये होता विराट, म्हणाला... 

थोडं पण कामाचं

  • कोहलीला जेव्हा विचारण्यात आले की तो कधी डिप्रेशनमध्ये गेला होता का, यावर कोहली म्हणाला की हो माझ्यासोबत हे घडले आहे.
  • कोहलीने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ७० शतके ठोकली आहेत
  • कोहली म्हणतो, डिप्रेशनचा परिणाम खेळाडूच्या करिअरवर होतो

मुंबई: जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक मानला जाणारा भारताचा कर्णधार विराट कोहली एकेकाळी डिप्रेशनने त्रस्त होता. विराटने सांगितले की २०१४मध्ये जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याची कामगिरी चांगली झाली नाही आणि तो सातत्याने अपयशी ठरत होता तेव्हा त्याला वाटले की तो जगात एकटाच आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर मार्क निकोल्ससोबत बातचीत करताना विराटने मान्य केले की त्या दौऱ्यादरम्यान तो आपल्या करिअरमधील सर्वात कठीण वेळेतून जात होता.

कोहलीला जेव्हा विचारण्यात आले की तो कधी डिप्रेशनमध्ये गेला होता का, यावर कोहली म्हणाला की हो माझ्यासोबत हे घडले आहे. हा विचार करून चांगले वाटत नाही की तुम्हीधावा करू शकत नाही आहात आणि मला वाटते सर्व फलंदाज कोणत्या ना कोणत्या वेळेस हे फील करत असतात. त्याने इंग्लंड दौऱ्याबाबत सांगितले की, तुम्हाला माहीत नसते की हे कसे पार करायचे आहे. ही अशी वेळ होती की मी गोष्टी बदलण्यासाठी काहीही करू शकत नव्हतो. मला असे वाटत होते की मी जगात एकटा आहे. 

कोहलीही होता तणावात

३२ वर्षीय कोहलीने सागितले की त्याच्या आयुष्यात त्याला साथ देणारे लोक खूप होते मात्र त्यानंतरही त्याला एकटे वाटत होते. तेव्हा त्याला खऱ्या मदतीची गरजहोते. तो म्हणाला, खासकरुन माझ्यासाठी ते नवीन होते कारण तुम्ही मोठ्या संघाचा भाग असूनही तुम्हाला एकटे वाटत आहे. मी असं म्हणणार नाही की माझ्यासोबत बोलण्यास कोणीही नव्हते. मात्र त्या पद्धतीने बोलणारे कोणी नव्हते जे मी कोणत्या त्रासातून जात आहे हे समजून घेतील. मला हे बदलायचे होते. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यत ७० शतके झळकावणाऱ्या भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की मानसिक आरोग्याचा मुद्दा नजरअंदाज केला जाऊ शकत नाही कारण यामुळे खेळाडूच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. कोहली 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी