IND vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागचे ट्विट जबरदस्त व्हायरल  

India vs Pakistan T20 World Cup match: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी सोमवारी ट्विट केले.

virender sehwag tweet viral after his reaction on firecrackers burst in some parts of india after pakistan win in t20 world cup
पाकिस्तानच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागचे ट्विट व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  वीरेंद्र सेहवाग म्हणाला - जर पाकिस्तानचा विजय झाला तर देशात फटाके फुटत असतील, तर दिवाळीला काय अडचण आहे
  • या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता.
  • रविवारी पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून मात केली

Sehwag reaction on  firecrackers burst in india :  T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाच्या मोहिमेची खराब सुरुवात झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला रविवारी सुपर-12 फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषक (वनडे, टी -20) मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. भारताच्या पराभवानंतर देशाच्या काही भागात कथितपणे फटाके फोडण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

'बरं ते क्रिकेटचा विजय साजरा करत असतील'

सेहवाग म्हणतो की देशात फटाक्यांवर बंदी आहे पण आता ते कुठून आले आहेत. तो म्हणाले की दिवाळीच्या दिवशी फटाके फोडले त्यात लोकांना वाईट दिसते .सोमवारी सेहवागने ट्विटरवर लिहिले की, “दिवाळीच्या वेळी फटाक्यांवर बंदी आहे पण काल ​​(रविवार) पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारताच्या काही भागात फटाके फोडण्यात आले. बरं ते क्रिकेटचा विजय साजरा करत असावेत. मग दिवाळीला फटाक्यांची काय अडचण आहे? दांभिकता कशाला, दिवाळी वेळीच सर्वांना ज्ञान  द्यावेसे वाटते. ' सेहवागच्या ट्विटवर यूजर्सकडून सतत प्रतिक्रिया येत आहेत आणि काही तासांत एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

विशेष म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने धावांचा पाठलाग करताना 17.5 षटकांत सामना जिंकला. कर्णधार बाबर आझम (68) आणि मोहम्मद रिझवान (79) यांनी चांगली फलंदाजी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी