टॉप प्लेयर्स ब्रेक घेतात, नवे खेळाडू येतात मात्र....सेहवागने केले सवाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 14:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virender Sehwag: माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय संघ आयसीसी टी20 वर्ल्डकप 2022मध्ये लाजिरवाण्या पद्धतीने पराभव झाल्यानंतर सिलेक्शनवर सवाल उपस्थित केले आहेत. 

virendra sehwag
टॉप प्लेयर्स ब्रेक घेतात, नवे खेळाडू येतात मात्र... 
थोडं पण कामाचं
  • भारत बाहेर झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटर्सने ऑस्ट्रेलियामध्ये रोहित ब्रिगेडच्या कामगिरीवर टीका केली.
  • या यादीत माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव जोडले गेले आहे.
  • या सर्वांनी टीम सिलेक्शनवर सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई: भारतीय संघाने(indian team)  टी20 वर्ल्डकप 2022 च्या() तयारीसाठी गेल्या 11 महिन्यात नऊ द्विपक्षीय मालिका खेळल्या यात त्यांना सहा मजबूत संघाचा सामना करावा लागला. भारताने न्यूझीलंड(new zealand), वेस्ट इंडिज(west indies), श्रीलंका(srilanka), दक्षिण अफ्रीका(south africa), इंग्लंड(england) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध(australia) आपला दम दाखवला. भारताला शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आणि त्यांच्या टी20 रँकिंगमध्ये सुधारणा झाली.virendra sehwag take a dig on team selection

सोबतच भारतीय संघ टी20 वर्ल्डकप जिंकण्यासाठीचा प्रमुख दावेदार मानला जात होता. दरम्यान, भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या मंचावर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. गुरूवारी सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मोठया पराभवास सामोरे जावे लागले. 

अधिक वाचा - निराशा आणि विस्मरणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

भारत बाहेर झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटर्सने ऑस्ट्रेलियामध्ये रोहित ब्रिगेडच्या कामगिरीवर टीका केली. या यादीत माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव जोडले गेले आहे. या सर्वांनी टीम सिलेक्शनवर सवाल उपस्थित केले आहेत. वरिष्ठ खेळाडूंना द्विपक्षीय मालिकेदरम्यान आराम दिला जातो. त्यावेळेस युवा खेळाडूंना संधी मिळते. मात्र जेव्हा वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा वरिष्ठ खेळाडू परततात आणि संघाला पराभव पत्करावा लागतो. 

सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितले, तुम्हा घरात द्विपक्षीय मालिका हरता मात्र तुम्हाला हे पाहावे लागेल की तुमचे किती टॉप प्लेयर्स त्यात खेळत आहेत. ते साधारणपणे ब्रेक घेतात आणि नवे खेळाडू उतरतात. जे द्विपक्षीय मालिका जिंकण्यात मदत करतात. अशातच जर नवे खेळाडू जिंकत आहेत तर त्यांना वर्ल्डकपमध्ये का नाही संधी दिली जात. 

अधिक वाचा - दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या पुलावरून धोकादायक प्रवास

तो पुढे म्हणाला, तुम्हाला नाही माहीत. असेही खेळाडू आहेत जे निडर होऊन क्रिकेट खेळतात. इशान किशन, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड निडर खेळाडू आहेत. हे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि धावा करतात. न्यूझीलंड दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूना आराम देण्यात आला आहे आणि अनेक तरूण खेळाडू आपली कामगिरी दाखवण्यास तयार आहेत.

जर ते न्यूझीलंडमध्ये जिंकतील तर त्यांना काय बक्षीस मिळेल? य़ासाठी वरिष्ठांवर दबाव असला पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे की असे खेळाडू चांगला स्कोर करत आहेत. जर वरिष्ठ कामगिरी चांगली करणार नाही तर त्यांना बोर्डाकडून धन्यवाद म्हटले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी