रविवारी पाटणा पायरेट्सना हरवून यू मुम्बा बाजी मारणार?

U Mumba vs Patna Pirates, vivo Pro Kabaddi League, Can U Mumba beat Patna Pirates? : प्रो कबड्डी लीग राउंड 2022 मध्ये रविवार 13 नोव्हेंबर 2022 रोजी यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स या दोन टीम आमनेसामने असतील.

U Mumba vs Patna Pirates
रविवारी पाटणा पायरेट्सना हरवून यू मुम्बा बाजी मारणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रविवारी पाटणा पायरेट्सना हरवून यू मुम्बा बाजी मारणार?
  • यू मुम्बाने पुणेरी पलटणचा 34-33 असा एका पॉइंटने पराभव केला
  • यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स या दोन्ही टीमचे प्रत्येकी 38 पॉइंट

U Mumba vs Patna Pirates, vivo Pro Kabaddi League, Can U Mumba beat Patna Pirates? : प्रो कबड्डी लीग राउंड 2022 मध्ये रविवार 13 नोव्हेंबर 2022 रोजी यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स या दोन टीम आमनेसामने असतील. ही लीग मॅच पुण्याच्या बालेवाडीतील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून मॅचचे थेट प्रक्षेपण सुरू होईल. 

याआधी शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या मॅचमध्ये यू मुम्बाने पुणेरी पलटणचा 34-33 असा एका पॉइंटने पराभव केला. अखेरच्या काही सेकंदांमध्ये यू मुम्बाने मॅच जिंकली. या थरारक मॅचमुळे चाहत्यांच्या यू मुम्बाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पॉइंट्स टेबलनुसार यू मुम्बा आणि पाटणा पायरेट्स या दोन्ही टीमचे प्रत्येकी 38 पॉइंट आहेत. यू मुम्बाची टीम प्रो कबड्डी लीग राउंड 2022 मध्ये 12 मॅच खेळून 7 वेळा जिंकली आहे आणि 5 वेळा हरली आहे. या उलट पाटणा पायरेट्सची टीम प्रो कबड्डी लीग राउंड 2022 मध्ये 12 मॅच खेळून 6 वेळा जिंकली आहे, त्यांचा 4 वेळा पराभव झाला आहे. पाटणा पायरेट्सच्या 2 मॅच टाय झाल्या आहेत. यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये यू मुम्बा 5व्या आणि पाटणा पायरेट्स 6व्या स्थानावर आहे. रविवारच्या मॅचमध्ये जिंकून पॉइंट्स टेबलमधील स्वतःची स्थिती सुधारण्याची संधी दोन्ही टीमकडे आहे. कोणती टीम ही संधी साधते याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष आहे.

द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

सेहवागने केले सवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी