मुंबई: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यात खेळवण्यात आलेला टी-२० वर्ल्डकपचा(t-20 world cup) बहुप्रतिक्षित सामना तब्बल १६ कोटी ७० लाख लोकांनी पाहिला. आतापर्यंत सर्वाधिक पाहिला गेलेला हा सामना आहे. स्पर्धेच्या अधिकृत प्रसारणकर्त्यांनी हा दावा केला आहे. स्टार इंडियाच्या(star india) जाहिरातीनुसार ेल्या आठवड्यापर्यंत क्वालिफयर आणि सुपर १२ राऊंडच्या सुरूवातीच्या १२ सामन्यांमध्ये टी-२० वर्ल्डकप एकूण २३ करोड ८० लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. viwership record in india pakistan t-20 world cup match
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेला २०१६ टी-२० वर्ल्डकपचा सेमीफायनलचा सामना याआधी सर्वाधिक पाहिला गेलेला सामना होता. हा सामना १३ कोटी ६० लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. जाहिरातीनुसार १६ कोटी ७० लाख प्रेक्षकांसह २४ ऑक्टोबरला झालेला बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला सामना आहे. या सामन्याने भारत-वेस्ट इंडिज यांच्यात २०१६मध्ये झालेल्या सेमीफायनलच्या सामन्याचा रेकॉर्डही मागे टाकला. भारत-पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी आयसीसीच्या या स्पर्धेत दोन वर्षानंतर आमने सामने होते.
भारत आणि पाकिस्तानने आपल्या अभियानाची सुरूवात २४ ऑक्टोबरला एकमेकांविरुद्धच्या सामन्यांनी केली होती. यात बाबर आझमच्या संघाने विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला तब्बल १० विकेटनी हरवले होते. भारताने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे तर दुसरीकडे भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दुबईमध्ये नामिबियाविरुद्धच्या सुपर १२ राऊंडमधील अखेरच्या सामन्यात भारताने नामिबियाला ९ विकेटनी हरवले. ययासोबतच भारताचे ५ही सामने संपले आणि स्पर्धेतील त्यांचा प्रवासही. सामन्यानंतर जेव्हा विराट कोहलीशी बातचीत झाली तेव्हा त्यांने अनेक बाबी खुलेपणाने मांडल्या. यात त्याने स्वत:ची चूक मान्य केली ज्यामुळे संपूर्ण स्पर्धा त्याच्यावर भारी पडली आणि भारताला सेमीफायनलही गाठता आली नाही.