Team India:BCCI चा मोठा निर्णय, द्रविडच्या जागी या दिग्गजाला बनवले coach

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 26, 2022 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India Coach: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या नव्या कोचची घोषणा केली आहे. हा दिग्गज क्रिकेटर आर्यलंड दौऱ्यावर द्रविडची जागा सांभाळणार आहे. 

rahul dravid
BCCI चा निर्णय, द्रविडच्या जागी या दिग्गजाला बनवले coach 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाला २६ जून ते २८ जून पर्यंत आर्यंलडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२- मालिका खेळायची आहे.
  • तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया कोच राहुल द्रविडसह इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
  • अशातच नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी म्हणजेच एनसीएचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत जातील.

मुंबई: आयपीएल २०२२(ipl 2022) नंतर टीम इंडियाला(team india) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्याच घरात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया इंग्लंड (england))आणि आयर्लंडचाही(ireland) दौरा करणार आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ बनवण्यात आले आहेत. अशातच बीसीसीआयने(bcci) मोठा निर्णय घेतला आहे आणि आयर्लंड दौऱ्यासाठी नव्या कोचची घोषणा केली आहे. VVS Laxman will be head coach for team india on ireland tour

अधिक वाचा - सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शेअर करा त्यांचे विचार

या दिग्गजाला मिळाली मोठी जबाबदारी

टीम इंडियाला २६ जून ते २८ जून पर्यंत आर्यंलडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२- मालिका खेळायची आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया कोच राहुल द्रविडसह इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. अशातच नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी म्हणजेच एनसीएचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत जातील. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार बोर्डाचे सचिव जय शाहर यांनी सांगितले की लक्ष्मण डबलिनमध्ये टीमसोबत जाईल. 

एकाच वेळेस दोन देशांचा दौरा करणार टीम इंडिया

भारताचा आयर्लंड दौरा २६ जूनपासून सुरू होईल तर टीम इंडिया १ जूनला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. त्याचे हे शेड्यूल्ड पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्याच वर्षी ४७ वर्षीय लक्ष्मणची एनसीएच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. राहुल द्रविडला मुख्य कोच बनवल्यानंतर व्ही व्ही एस लक्ष्मणकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

अधिक वाचा - आता अभिमानानं दाखवा तुमचे दात, वापरा फक्त 'या' पाच पावडर

आधीही टीम इंडियाचे २ कोच

गेल्यावर्षीही टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर होती. त्यावेळी एनसीएचे तत्कालीन प्रमुख द्रविडेने हेड कोच बनत श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यावर भारतीय संघाने वनडे आणि टी-२० मालिका खेळली होती. यावेळेस राहुल द्रविडच्या जागी लक्ष्मणवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी