India vs SA T20 Series: BCCI चा मास्टर प्लॅन! आता राहुल द्रविडसोबत VVS लक्ष्मणही असणार भारतीय संघाचे कोच 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 18, 2022 | 15:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs SA T20 Series । आयपीएल २०२२ च्या सत्रानंतर भारतीय संघाला आपल्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.

VVS Laxman will be the coach of the Indian team along with Rahul Dravid 
आता राहुल द्रविडसोबत VVS लक्ष्मणही असणार भारतीय संघाचे कोच   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • IPL नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे.
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ९ जून ते १९ जून पर्यंत टी-२० मालिका खेळवली जाईल.
  • भारतीय संघाला २६ जून ते २८ जून पर्यंत आयर्लंडविरूद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.

India vs SA T20 Series । नवी दिल्ली : आयपीएल २०२२ च्या सत्रानंतर भारतीय संघाला आपल्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ९ जून ते १९ जून पर्यंत टी-२० मालिका खेळवली जाईल. दरम्यान माहितीनुसार, व्हीव्हीएस लक्ष्मणला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. (VVS Laxman will be the coach of the Indian team along with Rahul Dravid). 

अधिक वाचा : हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम! काय आहे प्रकरण? 

राहुल द्रविडला मिळणार ही जबाबदारी 

भारतीय संघाला २६ जून ते २८ जून पर्यंत आयर्लंडविरूद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड राहुल द्रविड १५ किंवा १६ जूनला सिनियर खेळाडूंसोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतात. भारतीय संघ १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

VVS लक्ष्मणही बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक 

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल द्रविड १५ किंवा १६ जून रोजी भारतीय संघासोबत यूके दौऱ्यासाठी रवाना होईल. याशिवाय बोर्ड व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवेल.  

शिखर धवनकडे कर्णधारपद असण्याची शक्यता

माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेमध्ये सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत निवड समिती युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊ शकते. केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे खेळाडू भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत सिनियर संघाचा भाग असतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी