IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 16, 2022 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Zimbabwe: भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्याआधी मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार क्रिकेटर दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर गेला आहे. यामुळे संघ संयोजनाबाबत मोठी समस्या उभी राहिली आहे. 

team india
IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा झटका 
थोडं पण कामाचं
  • संघाचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर झाला आहे
  • सुंदरला आयपीएल २०२२ दरम्यान दुखापत झाली होती.
  • ओल्ड ट्रॅफर्डमध्ये लंकाशायर आणि वोरस्टरशायर यांच्यात रॉयल लंडन कप खेळताना फिल्डिंग करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

मुंबई: भारतीय संघाला(indian team) झिम्बाब्वे दौऱ्यावर(zimbawbe tour) तीन वनडे सामन्यांची(one day series) मालिका खेळायची आहे. यासाठी लोकेश राहुलला(lokesh rahul) कर्णधार बनवण्यात आले आहे. टीम इंडियासाठी झिम्बाब्वे दौऱ्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. Washington sundar will not played in zimbawbe tour due to injury

अधिक वाचा - विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल पत्नी ज्योती मेटे यांना संशय

बाहेर झाला हा ऑलराऊंडर

संघाचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर झाला आहे. सुंदरला आयपीएल २०२२ दरम्यान दुखापत झाली होती. मात्र त्यानंतर तो ठीक होत काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठीगेला होता मात्र तेथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही आणि तो दुखापतग्रस्त झाला. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये लंकाशाय आणि वोरस्टरशायर यांच्यात रॉयल लंडन कप खेळताना फिल्डिंग करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. तो नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबमध्ये राहणार आहे. 

दुखापत बनली मोठी समस्या

वॉशिंग्टन सुंदर महत्त्वाच्या दौऱ्याआधी दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाच्या बाहेर राहत आहे. आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने त्याला इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळता आली नव्हती. तर जानेवारीमध्ये त्याला कोविडही झाला होता. वॉशिंग्टन सुंदरकडे जबरदस्त प्रतिभा आहे. त्याने आपल्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिलेत. सुंदर जबरदस्त गोलंदाजी आणि बॅटिंगसाठी फेमस आहे. 

अधिक वाचा - 7 वर्षांचा संसार, कौटुंबिक कोर्टातच पतीनं चिरला पत्नीचा गळा

भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळलाय

वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळ केला आहे. त्याने टीम इंडियासाठी ४ कसोटी सामन्यात २६५ धावा आणि ६ विकेट मिळवल्यात. तर चार वनडे आणि ३१ टी-२० सामन्यात खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४७ धावा आणि गोलंदाजीच २५ विकेट मिळवल्यात. झिम्बाब्वे दौऱ्यातन त्याचे बाहेर होणे हे टीम इंडियासाठी एखाद्या झटक्यापेक्षा कमी नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी