Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला मुद्दाम केले दुखापतग्रस्त? या खेळाडूच्या विधानाने गोंधळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 30, 2022 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आता टीम इंडियामधून खेळू शकणार नाही. त्याच्या दुखापतीबाबत भारताच्या एका माजी खेळाडूने विधान केले आहे. 

jasprit bumrah
बुमराहला मुद्दाम केले दुखापतग्रस्त? या खेळाडूचे विधान 
थोडं पण कामाचं
  • जसप्रीत बुमराहचे आयसीसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणे खूप नुकसानदायक आहे.
  • बुमराह टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जातो.
  • बुमराह पाठदुखीच्या गंभीर त्रासाने त्रस्त आहे आणि त्याला अनेक महिने संघाबाहेर रहावे लागू शकते.

मुंबई: टीम इंडियाचा(team india) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah) आशिया कप 2022(asia cup 2022)नंतर आता टी-20 वर्ल्डकप 2022(t-20 world cup)मध्येही संघाचा भाग असणार नाही. तो पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. यातच भारताच्या माजी खेळाडूने हैराणजनक विधान केले आहे. हे विधान जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत केले आहे. wasim jaffer statement about jasprit bumrah injury's

अधिक वाचा - 'विक्रम वेधा'ला प्रेक्षकांची पसंती, कमेंट्सचा वर्षाव

टीम इंडियासाठी मोठा झटका

जसप्रीत बुमराहचे आयसीसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणे खूप नुकसानदायक आहे. बुमराह टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जातो. बुमराह पाठदुखीच्या गंभीर त्रासाने त्रस्त आहे आणि त्याला अनेक महिने संघाबाहेर रहावे लागू शकते. जसप्रीत बुमराह तिसऱ्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चरची शिकार झाला आहे. जसप्रीत बुमराह आशिया कप 2022च्या आधीही स्ट्रेस फ्रॅक्चरचा शिकार झाला होता. 

या दिग्गजाच्या विधानाने खळबळ

टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरचे बुमराहच्या दुखापतीबाबत म्हणणे आहे की त्याच्या पुनरागमनाबाबत टीम इंडियाने खूपघाईकेली. ईएसपीएन क्रिकइंफोवर वसीम जाफर म्हणाला, स्ट्रेस फ्रॅक्टचर आधीपासूनच असू शकते. केवळ दोन सामने खेळून इतका जास्त त्रास होऊ शकत नाही. त्याला सामना खेळवण्यात खूप घाई केली. वसीम जाफरने असे विधान करत कुठे ना कुठे टीम मॅनेजमेंटवर सवाल उपस्थित केले आहेत. 

बुमराहला आराम करण्यावर दिला जोर

वसीम जाफरने पुढे सांगितले की, मला वाटते की त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात खेळवण्यापेक्षा त्याला आणखी जास्त आराम दिला असता आणि तो टी-20 वर्ल्डकपसाठी पूर्ण फिट झाला असता. मला नाही माहीत ती त्याची दुखापत किती गंभीर आहे मात्र मला वाटते की त्याला आणखी आरामासाठी वेळ द्यायला हवा होता.

अधिक वाचा - ONGCच्या नोकरीसाठी कल्याणच्या डॉक्टरला लावला 12 लाखांचा चुना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तर पुढील दोन सामन्यांत तो प्लेईंग 11चा भाग बनला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी