IND vs SA: अरूण जेटली स्टेडियमवर आपापसात भिडले फॅन्स; लाथा-बुक्क्यांचा करत होते वर्षाव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 11, 2022 | 14:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fans Fight During Ind vs SA 1st ODI । सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला. यासामन्यात खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधले पण खेळाडूंसोबत काही चाहते देखील खूप चर्चेत आले आहेत.

Watch the video of the fight between the fans at Arun Jaitley Stadium 
अरूण जेटली स्टेडियमवर आपापसात भिडले फॅन्स, पाहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.
  • पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवला विजय.
  • अरूण जेटली स्टेडियमवर आपापसात भिडले फॅन्स.

Fans Fight During Ind vs SA 1st ODI । नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला. यासामन्यात खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधले पण खेळाडूंसोबत काही चाहते देखील खूप चर्चेत आले आहेत. कारण दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियमच्या ईस्ट स्टँडमध्ये बसलेले काही प्रेक्षक एकमेकांशी भिडले. यादरम्यान दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्यांचा जोरदार वर्षाव चाल होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी धाव घेत प्रकरण शांत केले. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Watch the video of the fight between the fans at Arun Jaitley Stadium).  

अधिक वाचा : आईच्या प्रियकराने घेतला होता मुलीचा जीव, आरोपीने दिली कबुली

मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओच्या सुरुवातीला दोन चाहते एका मुलाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे, मात्र काही वेळाने आणखी दोन चाहते आले आणि त्याच मुलावर लाथांचा वर्षाव करू लागले. या मारामारीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एक व्यक्ती खूपच उत्साहित असल्याचे सांगितले जात आहे. सामना पाहण्यासाठी तो पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आला असावा. भारताचा मोठा ध्वजही त्यांने हातात घेतला होता. त्यामुळे त्यांना कदाचित सारख्या समस्या येत होत्या. निराशा सुरू झाली त्यानंतर फ्लॅग मॅनने मागच्या स्टँडवरून आणखी लोकांना बोलावले आणि वादाला सुरूवात झाली. 

इथे पाहा व्हिडीओ

सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, ईशान किशनच्या ७६ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. डेव्हिड मिलर आणि व्हॅन डर ड्युसेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिकेच्या संघाने ५ चेंडू आणि ७ बळी राखून ही धावसंख्या गाठली. या मालिकेतील दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथे खेळवला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी