Watch Video, Shreyas Iyer bowls off-spin vs Sri Lanka; Virat Kohli surprised by turn, reaction goes viral : तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये काल (रविवार 15 जानेवारी 2023) भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वन डे मॅच झाली. ही मॅच 317 धावांनी जिंकत भारताने श्रीलंकेविरुद्धची 3 वन डे मॅचची सीरिज 3-0 अशी जिंकली. तिसरी वन डे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. यापैकी एक कारण आहे ते भारतीय बॉलर श्रेयस अय्यर याने टाकलेला एक स्पिन बॉल.
श्रेयस अय्यरने तिसऱ्या वन डे मध्ये फक्त 1 ओव्हर टाकली आणि 2 रन दिल्या. याच ओव्हरमध्ये त्याने पहिला बॉल असा टाकला जो कमालीच्या वेगाने स्पिन झाला. स्पिन बघून श्रीलंकेचा बॅटर लाहिरू कुमारा चक्रावून गेला. टप्पा पडला आणि बॉल झपकन ऑफ स्टंपच्या दिशेने स्पिन झाला. बॉल टर्न होत असल्याचे बघून भारताचा विकेटकीपर केएल राहुल पुढे सरसावला. त्याने स्टंपच्या मागे हा बॉल झेलला. बॉल जास्त दूर जाणार नाही याची खबरदारी केएल राहुलने घेतली. हा घातक बॉल बॅटला स्पर्शून गेला असता तर केएल राहुलला कॅच घेण्याची संधी मिळाली असती आणि श्रीलंकेचा आणखी एक बॅटर बाद झाला असता. ते झाले नाही. पण घातक स्पिन बघून टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि प्रमुख बॅटर विराट कोहली याची बोलती बंद झाली. त्याने स्पिन बघून चक्क तोंडावर हात ठेवला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारताने श्रीलंकेविरुद्धची तिसरी वन डे 317 धावांनी जिंकली. याआधी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 390 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने 42, शुभमन गिलने 116, विराट कोहलीने नाबाद 166, श्रेयस अय्यरने 38, केएल राहुलने 7, सूर्यकुमार यादवने 4 आणि अक्षर पटेलने नाबाद 2 धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करणारी श्रीलंकेची टीम 22 ओव्हरमध्ये 73 धावा करून ऑलआऊट झाली.