Chetan Sharma's surprising revelation : विराट कोहली ऐवजी जेव्हा रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन बनवले तेव्हा या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आता या संबंधी एक व्हीडियो समोर आला आहे ज्यात चेतन शर्माने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने यात सांगितले आहे की का विराटच्या जागी रोहित शर्माला का निवडले गेले. रोहितच्या नावावर सगळे सहमत होते. उलट विराट कोहलीच्या विरोधात होते आणि हेच या सगळ्या मागचे कारण होते. विराट कोहली स्वःतला खेळापेक्षा मोठा समजतो. यामुळेच निवड समितीने कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे चेतन शर्मा म्हणाले.
झी मीडिया हाऊसच्या स्टिंग व्हिडिओमध्ये चेतन शर्माने खुलासा केला आहे की खेळाडू फिटनेस इंजेक्शन्स वापरत आहेत आणि बीसीसीआय जाणून बुजून प्रमुख खेळाडूंच्या इंजेक्शन फिटनेसकडे दुर्लक्ष करत आहे. काही खेळाडू स्वत:च्या स्थानाचा आणि ठराविक खेळाडूंसोबतच्या ओळखीचा फायदा घेऊन निवड समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. ईशान किशन आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीमुळे संजू सॅमसन, केएल राहुल आणि शिखर धवन यांचे करिअर धोक्यात आले आहे, असेही चेतन शर्मा स्टिंग व्हिडीओत म्हणाले.