विराट कोहलीने तोडला आणखी एक टी-२० रेकॉर्ड, बनला सगळ्यात जास्त धावा करणारा भारतीय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 05, 2019 | 07:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान सुरेश रैनाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

virat kohli record
विराट कोहली रेकॉर्ड 

थोडं पण कामाचं

  • विराटने सुरेश रैनाचा टी-२० रेकॉर्ड तोडला
  • टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
  • आयपीएलमध्येही विराटच्या नावावर सर्वाधिक धावा

फ्लोरिडा: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात जास्त चालली आहे. रविवारी त्याने २३ चेंडूत २८ धावांची खेळी केली. शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने १९ धावांची खेळी केली होती. दोन सामन्यात त्याने दोन छोटी खेळी केल्यानंतरही विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने सुरेश रैनालाही मागे टाकले. 

या सामन्यात आधी विराटला टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटर बनण्यासाठी केवळ पाच धावांची आवश्यकता होता. या सामन्याआधी त्याने २६७ सामन्यांतील २५३ डावांत ८,३८८ धावा केल्या. मात्र रविवारी त्याने २३ धावांच्या खेळीदरम्यान पाचवी धाव घेत अशताना विराटने रैनाला मागे टाकले. रैनाने ३१९ टी-२० सामन्यात ३२.६५च्या सरासरीने आणि १३८.०२ च्या स्ट्राईक रेटने ८३९२ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर आता ८४११ धावा झाल्या आहेत. विराट आणि रैनानंतर सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटरच्या यादीत रोहित शर्मा ३१६ सामन्यांत ८२९१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये जगातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आङे. विराटने ६९ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये २३१० धावा केल्यात. तर रोहित शर्माने ९६ सामन्यांत २४२२ धावा केल्या आहेत. विराट आयपीएलमध्येही सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटर आहे. त्याच्या नावावर १७७ आयपीएल सामन्यांत ५४१२ धावा आहेत. तर रैनाने १९३ आयपीएल सामन्यात ५३६८ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने १८८ आयपीएलमध्ये ४८९८ धावा केल्या आहेत. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराटची जादू तितकीशी चालली नाही. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ५ बाद १६७ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईसनुसार १५.३ ओव्हरमध्ये केवळ ९८ धावा करता आल्या. त्यांना १२१ धावा करायच्या होत्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने ६७ धावा केल्या. तर शिखर धवनने २३ धावा केल्या. विराट कोहली २८ धावा करून बाद झाला. तर रिषभ पंतला केवळ ४ धावा करता आल्या. मयंक पांडेने ६ धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने नाबाद २० धावा फटकावल्या. दुसरीकडे पावसाने मध्येच एंट्री केल्याने डकवर्थ लुईसनुसार वेस्ट इंडिजला विजयासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र हे आव्हानही विंडिजला पूर्ण करता आले नाही. त्यांचा संपूर्ण डाव ९८ धावांवर आटोपला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी