टेनिस किंग रॉजर फेडररचे आठ विक्रम जे त्याचे मोठेपण सिद्ध करतात

What Big records does Roger Federer hold and List of his career achievements : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय टेनिस सामना खेळून निवृत्ती घेतली.

Roger Federer
रॉजर फेडरर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • टेनिस किंग रॉजर फेडररचे आठ विक्रम जे त्याचे मोठेपण सिद्ध करतात
 • वीस ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू
 • सर्वाधिक काळ नंबर एटीपी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला खेळाडू

What Big records does Roger Federer hold and List of his career achievements : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय टेनिस सामना खेळून निवृत्ती घेतली. या सामन्यात फेडररचा पराभव झाला. लेव्हर कप स्पर्धेतील या सामन्यानंतर फेडरर तसेच मैदानात उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी होते. टेनिसप्रेमींनी उभे राहून टाळ्या वाजवत फेडररचे त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीसाठी जाहीर कौतुक केले. सलग 24 वर्ष आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्द करून अनेक विक्रम साकारण्याची किमया रॉजर फेडररने साधली. तो कारकिर्दीत 1526 सिंगल्स (एकेरी) आणि 224 डबल्स (दुहेरी) मॅच खेळला. रॉजर फेडरर या स्विस टेनिसपटूने केलेले आठ विक्रम आजही त्याचे मोठेपण सिद्ध करतात.

चर्चेतल्या सेलिब्रेटींची प्रसिद्धीपासून दूर असलेली मुलं

सनी लिओनीचा ट्रॅडिशनल हॉट अवतार

रॉजर फेडररने साकारलेले आठ सर्वोत्तम विक्रम

 1. वीस ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू. रॉजर फेडररने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून विसावे ग्रँडस्लॅम जिंकले. फेडररपेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया राफेल नदाल (22) आणि नोव्हाक जोकोविच (21) यांनी साधली आहे.
 2. सर्वाधिक काळ नंबर एटीपी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला खेळाडू. रॉजर फेडरर 2 फेब्रुवारी 2004 ते 10 ऑगस्ट 2008 पर्यंत 237 आठवडे एटीपी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता. 
 3. फेडरर आठ वेळा विंबल्डन जिंकलेला एकमेव पुरुष टेनिसपटू. त्याने 2003 ते 2006 या काळात सलग चार वेळा विंबल्डन जिंकले. ग्रास कोर्टवर सर्वाधिक 65 आंतरराष्ट्री टेनिस सामने खळण्याचा अनुभव असलेला खेळाडू.
 4. फेडरर सर्वाधिक ग्रँडस्लॅम सेमी फायनल खेळलेला खेळाडू. तो 23 ग्रँडस्लॅम सेमी फायनल खेळला. एवढ्या ग्रँडस्लॅम सेमीफायनल खेळलेला एकमेव टेनिसपटू. नोव्हाक जोकोविचचा नंबर सर्वाधिक सेमी फायनल खेळणाऱ्यांमध्ये दुसरा आहे. तो 16 ग्रँडस्लॅम सेमी फायनल खेळला.
 5. फेडरर सर्वाधिक 369 ग्रँडस्लॅम मॅच जिंकलेला टेनिसपटू. तो पहिली ग्रँडस्लॅम मॅच 2000 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जिंकला. फेडरर शेवटची ग्रँडस्लॅम मॅच 2021 मध्ये विंबल्डनमध्ये जिंकला. 
 6. फेडरर 2006, 2007 आणि 2009 या तिन्ही वर्षी सर्वच्या सर्व म्हणजे चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या फायनलमध्ये पोहोचला होता. अशी कामगिरी करणारा तो एकमेव टेनिसपटू. 
 7. फेडरर सलग दहा ग्रँडस्लॅम फायनल खेळलेला एकमेव टेनिसपटू. या विक्रमाची सुरुवात 2005 मध्ये विंबल्डन स्पर्धेने झाली. तो 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची सेमी फायनल हरला तोपर्यंत या विक्रमात भर पडत होती. 
 8. फेडरर ओपन एरामध्ये 100 ग्रँडस्लॅम मुख्य ड्रॉ मॅच जिंकलेला पहिला पुरुष टेनिसपटू. तो सर्वाधिक 58 ग्रँडस्लॅम क्वार्टर फायनल खेळलेला टेनिसपटू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी