विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये बाबर आझमशी काय झाले होते बोलणे...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 13, 2021 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Babar azam and virat kohli converation: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२१दरम्यान सामना खेळवण्यात आला होता. येथे टॉस आधी दोन्ही संघांच्या कर्णधार विराट कोहली  एकमेकांशी बोलताना दिसले होते. 

babar azam
कोहलीचे टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये आझमशी काय झाले होते बोलणे 
थोडं पण कामाचं
  • टी२० वर्ल्डकप २०२१ मध्ये दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने आले होते तेव्हा पाकिस्तानने १० विकेटनी विजय मिळवला
  • . दरम्यान या सामन्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे की टॉसच्या वेळेस दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये काय बोलणे झाले होते.
  • टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता

मुंबई: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. टी२० वर्ल्डकप २०२१ (T20 World Cup 2021)मध्ये दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने आले होते तेव्हा पाकिस्तानने १० विकेटनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे की टॉसच्या वेळेस दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये काय बोलणे झाले होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमन (Babar Azam)ला तर हेही विचारण्यात आले की २४ ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२१ दरम्यान विराट कोहली(Virat Kohli) सोबत त्याचे काय बोलणे झाले होते. what is conversation between virat kohli and babar azam during t-20 world cup 2021

या प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी कर्णधाराने सांगितले की तो याबाबत काही सांगितले नाही.. समा टीव्हीनुसार बाबर आझमला विचारण्यात आले की टॉस आधी विराट कोहलीशी त्याचे काय बोलणे झाे. यावर आझम म्हणाला मी सर्वांसमोर याचा खुलासा करणार नाही. 

भारताचा झाला होता मोठा पराभव

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. या सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला होता. १० विकेटनी भारताला पराभवास सामोरे जावे लागले होते. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. यावर पाकिस्तानने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य पूर्ण केले. मोहम्मद रिझवानने ७९ धावा आणि बाबर आझमने ६८ धावांची खेळी केली होती. तर भारतासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने ५७ केल्या होत्या. 

भारत सुपर १२ स्टेजमध्येच बाहेर झाला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानने नॉकआऊटसाठी क्वालिफाय केले होते. मात्र त्यांना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. बाबर आझमने या स्पर्धेत सर्वाधिक ३०३ धावा केल्या होत्या. त्याने ६ डावांत ६०.६०च्या सरासरीने ३०३ धावा केल्या. यात ४ अर्धशतके ठोकली. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी