IND vs NZ 2nd T20I Live Streaming: भारत वि न्यूझीलंड दुसरा सामना, कुठे आणि कधी पाहाल...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2021 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand (IND vs NZ) Live Cricket Score Streaming Online: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना आज होत आहे. हा दुसरा सामना कुठे आणि कधी खेळवला जाणार आहे तसेच किती वाजता सुरू होणार आहे जाणून घेऊया. 

india vs new zealand
IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड सामना, कुठे आणि कधी पाहाल... 
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडचा भारत दौरा २०२१- दुसरा टी-२० सामना
  • मालिका जिंकण्याची भारताचा संधी
  • तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर

India vs New Zealand (IND vs NZ) 2nd T20 Live Cricket Score Streaming Online: पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर(new zealand) ५ विकेटनी मात केल्यानंतर टीम इंडिया(team india) तीन सामन्यांच्या मालिकेत(t-20 series) १-०ने आघाडीवर गेली आहे. आता दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून ही मालिका खिशात घालण्याचे भारताचे प्रयत्न असतील. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ कोणत्याही परिस्थितीत दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या टी-२० सामन्यात जयपूरच्या मैदानावर टीम इंडिया नवा कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(rahul dravid) यांच्या मार्गदर्शनाखाली उतरली. या जोडीने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. आता या जोडीचे लक्ष्य असेल ते म्हणजे पहिला मालिका विजय. ज्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची तयारी अधिक मजबुतीने करता येईल. जाणून घ्या तुम्ही हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता. when and where to see india vs new zealand second t-20 match

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० कधी खेळवला जाणार आहे?(When India-New Zealand 2nd T20I will be played?)

टीम इंडिया आणि पाहुणे न्यूझीलंड संघादरम्यान टी-२० मालिकेतील दुसरा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जात आहे. 

कोणत्या मैदानावर खेळवला जाणार भारत-न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना  (Where IND vs NZ 2nd T20 Match will be played?)

भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

भारत वि न्यूझीलंड सामन्याची वेळ (What time will India vs New Zealand 2nd T20I begin?)

न्यूझीलंड आणि यजमान टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. या सामन्याचा टॉस संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी असेल. 

कोणत्या चॅनेलवर तुम्ही सामना लाईव्ह पाहू शकता?(Which channel will telecast IND vs NZ 2nd T20I Match in India?)

टीम इंडिया-न्यूझीलंडच्या दुसऱ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिल, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड़  चॅनेलवर पाहू शकता. 

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शका. 

हे आहेत दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज. 

न्यूझीलंड: टीम साउदी (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेरिल मिचेल, टॉड एस्टल, अॅडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिशेल सँटनर, टीम सीफर्ट, ईश सोढ़ी, मार्क चॅपमॅन, लॉकी फर्ग्युसन आणि काइल जॅमीसन. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी