केपटाऊन : आजपासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. भारताचे नेतृत्व कार्यवाहक कर्णधार केएल राहुलकडे आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने सध्या राहुलकडे हे नेतृत्व देण्यात आले आे. तर आफ्रिकन संघाचे नेतृत्व तेम्बा बावुमा करत आहे. भारताला याआधी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे पाहुणा संघ या मालिकेत पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे कसोटीप्रमाणे वनडे मालिकेतही विजयी रथ कायम राखण्याचा आफ्रिका प्रयत्न करेल.
भारत आणि द. आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना १९ जानेवारी(बुधवार) खेळवला जात आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना पर्लच्या बोलँड पार्क स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. टॉस १ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे.
भारत वि दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना तुम्ही लाईव्ह स्टार स्पोर्ट्स 1/1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/ 1 एचडी हिंदीवर पाहू शकता.
भारत वि दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.