जंगलात जेव्हा जडेजाच्या चुकीमुळे Rohit Sharma आणि Ajinkya Rahane चा जीव गेला असता...

Rohit Sharma - Ajinkya Rahane | रविंद्र जडेजामुळे भारतीय क्रिकेटचे (Indian Cricket stars) दोन स्टार, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे संकटात सापडले होते. त्यांच्या अक्षरश: जीवावर बेतली होती. फक्त त्यांच्याच नाही तर त्यांच्या दोघांच्या पत्नीच्याही जीवावर बेतली होती. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) एकदा चित्त्यांबरोबर जडेजाने या सर्वांना अडचणीत आणले होते.

Rohit Sharma & Jadeja
रोहित शर्मा आणि रहाणेचा जीव जेव्हा जडेजाने धोक्यात घातला 
थोडं पण कामाचं
  • जडेजामुळे संकटात सापडण्याच्या या किश्याचा उल्लेख एका खुद्द रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी एका कार्यक्रमात केला
  • रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे या दोघांचा कुटुंबासमवेत जीव गेला असता
  • रोहित शर्मा आपली पत्नी रितिका सजदेह, तर अजिंक्य रहाणे आपली पत्नी राधिका आणि त्यांच्याबरोबर रविंद्र जडेजा एका जंगल सफारीवर गेले होते

Rohit Sharma - Ajinkya Rahane | नवी दिल्ली: रविंद्र जडेजाच्या (Ravindra jadeja) चुकीमुळे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि त्यांच्या पत्नी संकटात सापडल्या होत्या. एरवी रविंद्र जडेजा हा भारतीय क्रिकेट संघातील मस्तमौला खेळाडू म्हणून ओळखला जातो. मैदानावर रविंद्र जडेजाच्या हालचाली लक्ष वेधून घेत असतात. मात्र याच रविंद्र जडेजामुळे भारतीय क्रिकेटचे (Indian Cricket stars) दोन स्टार, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे संकटात सापडले होते. त्यांच्या अक्षरश: जीवावर बेतली होती. फक्त त्यांच्याच नाही तर त्यांच्या दोघांच्या पत्नीच्याही जीवावर बेतली होती. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) एकदा चित्त्यांबरोबर जडेजाने या सर्वांना अडचणीत आणले होते. जडेजाच्या या वागण्यामुळे रोहितला त्याला एक ठोसा मारण्याचा विचार आला होता. (When because of Ravindra Jadeja, Rohit Sharma & Ajinkya Rahane could have lost their lives in jungle)

भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा

जडेजामुळे संकटात सापडण्याच्या या किश्याचा उल्लेख एका खुद्द रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी एका कार्यक्रमात केला होता. व्हाट द डक या शोमध्ये अॅंकरशी बोलताना या दोघांनी सांगितले होते की कसे एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे या दोघांचा कुटुंबासमवेत जीव गेला असता. २०१८च्या सुरूवताली भारत तीन कसोटी सामने, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारतीय संघाने पहिले दोन कसोटी सामने गमावले होते. त्यानंतर तिसरा सामना जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० मालिकादेखील जिंकली होती.

जडेजाने चित्त्यासमोर केली मोठी चूक

दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा आपली पत्नी रितिका सजदेह, तर अजिंक्य रहाणे आपली पत्नी राधिका आणि त्यांच्याबरोबर रविंद्र जडेजा एका जंगल सफारीवर गेले होते. या सफारीतील किश्याबद्दल बोलताना रोहित शर्माने सांगितले की या सफारी दरम्यान त्यांना जंगलात काही चित्ते दिसले. हे चित्ते तेव्हा काहीतरी खात होते. जेव्हा हे कोणतेही जंगली पशू खात असतात तेव्हा त्यांना त्रास दयायचा नसतो किंवा त्यांच्या कामात व्यत्यत आणायचा नसतो. नाहीतर अशावेळी हे जंगली पशू अतिशय संतापतात आणि ते काहीही करू शकतात. चित्त्यांच्या बाबतीत देखील हीच बाब लागू होते. मात्र रविंद्र जडेजाने नेमके तिथे आरडाओरडा करण्यास सुरूवात केली आणि तो चित्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधू लागला. चित्त्यांना तो आपल्याकडे बोलावू लागला. यामुळे ते चित्ते त्यांच्याकडे येऊ लागले. ही अतिशय भयानक स्थिती होती. कारण अशावेळी ते चित्ते या सर्वांवर हल्ला करू शकले असते आणि त्यात या सर्वांना आपला जीवदेखील गमवावा लागला असता. रोहित शर्माने पुढे सांगितले की त्याने जडेलाला म्हटले की हे तू काय करतो आहेस? आपण जंगलात आहोत. जर चित्त्यांनी आपल्याला पाहिले तर ते आपल्यावर हल्ला करून आपली शिकार करतील.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी