लग्नानंतर धोनीने पाहा कुठे साजरा केला होता पहिला बर्थडे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 07, 2020 | 12:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ३९वा वाढदिवस. धोनीने आपला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस रांचीमध्ये साक्षीसोबत साजरा केला होता.

ms dhoni
लग्नानंतर धोनीने पाहा कुठे साजरा केला होता पहिला बर्थडे 

थोडं पण कामाचं

  • धोनीचा आज ३९वा वाढदिवस
  • धोनीच्या वाढदिवसाच्या आधी ४ जुलैला त्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो
  • धोनीने भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेले

मुंबई: महेंद्रसिंग धोनी...भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव. धोनीला आजच्या जगात कोणी ओळखत नाही तर नवलचं म्हणावे लागेल. धोनीने भारतीय क्रिकेटला एक वेगळी ओळख मिळवून दिली. २००७चा टी-२० वर्ल्डकप असो वा २०११मधील वनडे वर्ल्डकप. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एका नव्या उंचीवर नेले. आज जो भारताचा क्रिकेटमधील यशस्वी संघ आहे त्यात धोनीचे योगदान मोलाचे आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त उंचावली. 

निर्णायक आणि संकटाच्या क्षणी शांत राहून कसे योग्य निर्णय घ्यावेत हे धोनीकडून शिकावे. आपल्या अचूक निर्णयांनी त्याने ते वेळोवेळी दाखवून दिले आहे. म्हणूनच त्याला कॅप्टन कूल हे बिरूद देण्यात आले. संयमाने घेतलेले निर्णय हे नेहमीच यशस्वी ठरतात हे धोनीने प्रत्येकवेळेस दाखवून दिले. याच धोनीचा आज वाढदिवस. धोनी आज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. 

काही दिवसांपूर्वीच धोनीच्या लग्नाचा वाढदिवस होता. ४ जुलैला धोनी आणि साक्षीच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. त्यांना जीवा ही मुलगी आहे. धोनीच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नी साक्षीने सोशल मीडियावर मेसेज लिहित त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. काही जण म्हणतात की धोनी आणि साक्षी एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. मात्र तसे नाही. तुम्हाला माहीत आहे का धोनीने लग्नानंतरचा आपला पहिला बर्थडे कुठे साजरा केला होता?

२०१०मध्ये धोनी आणि साक्षीचे लग्न झाले. २००७मध्ये धोनी आणि साक्षीची भेट झाली होती. त्यानंतर २०१०मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.सगळ्यांना वाटते की ते दोघे एकमेकांचे लहानपणीचे मित्र आहेत. मात्र चेन्नई सुपर किंग्सशी बोलताना साक्षीने हे कन्फ्युजन दूर केले. धोनी आणि साक्षी यांच्यात ७ वर्षांचे अंतर आहे आणि आम्ही लहानपणीचे मित्र नाहीत असे साक्षीने सांगितले. २०१०मध्ये धोनीच्या बर्थडेच्या वेळेस साक्षी पहिल्यांदा रांचीला गेली होती. धोनीचा लग्नानंतरचा पहिला बर्थडे रांचीला साजरा करण्यात आला होता. धोनीच्या बर्थडेच्या काही दिवस आधीच म्हणजेच ४ जुलैला त्याच्या लग्नाचा बर्थडे असतो. देहरादूनमध्ये धोनी आणि साक्षीने लग्न केले. त्यानंतर साक्षी पहिल्यांदा रांचीला गेली. 

धोनी क्रिकेटबद्दल खूप पॅशनेट - साक्षी पुढे म्हणाली, माही क्रिकेटबद्दल खूप पॅशनेट आहे. साक्षीने जिवाच्या जन्माच्या वेळेचा किस्सा सांगितला. त्यावेळी जिवाला जन्म देण्यासाठी साक्षी सज्ज झाली होती आणि साक्षीला धोनीने जवळ असावे असे वाटत होते. मात्र वर्ल्डकप असल्याने धोनीला साक्षीजवळ राहता आले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी