धोनी कर्णधार असताना टीम इंडियाच्या खेळाडूंनी जर्सीवर लिहिली होती आईंचे नावे, दिल्या होत्या Mother's Day च्या शुभेच्छा

मातृदिन किंवा सोप्या भाषेतील 'मदर्स डे'  (Mother's Day ) म्हणा आज हा दिवस असून अनेकजण आपल्या आईला या दिवशी शुभेच्छा देत असतात. आईविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण शायरी किंवा ग्रीटिंग्स देत असतो. भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian cricket team) खेळाडूंनीही मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनोखा प्रयोग केला होता. 2016 मध्ये न्युझीलंडचा (New Zealand) संघ भारताच्या दौऱ्यावर होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)  कर्णधार (Captain) अन् विराट कोहली उप-कर्णधार असताना भारतीय संघ

 When Indian players were writing mother's name on their jerseys
जेव्हा भारतीय खेळाडूंनी आपल्या जर्सीवर लिहिलं होत आईचं नाव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • महेंद्रसिंग धोनी कर्णधार अन् विराट कोहली उप-कर्णधार असताना भारतीय संघाने आपल्या आईंना मातृदिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या होत्या.
  • ICC विश्वचषक सेमीफायनलमधील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्या दरम्यान खेळाडूंनी त्यांच्या आईंची नावे अभिमानाने आपल्या जर्सीवर लिहिली होती.

नवी दिल्ली : मातृदिन किंवा सोप्या भाषेतील 'मदर्स डे'  (Mother's Day ) म्हणा आज हा दिवस असून अनेकजण आपल्या आईला या दिवशी शुभेच्छा देत असतात. आईविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण शायरी किंवा ग्रीटिंग्स देत असतो. भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian cricket team) खेळाडूंनीही मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनोखा प्रयोग केला होता. 2016 मध्ये न्युझीलंडचा (New Zealand) संघ भारताच्या दौऱ्यावर होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)  कर्णधार (Captain) अन् विराट कोहली उप-कर्णधार असताना भारतीय संघाने आपल्या आईंना मातृदिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या होत्या. भारतीय संघाने त्यावेळी ICC विश्वचषक सेमीफायनलमधील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्या दरम्यान खेळाडूंनी त्यांच्या आईंची नावे अभिमानाने आपल्या जर्सीवर लिहिली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानेचं हे कृत्य लाखो आईंना अन् मातांना आवडलं होतं.

या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलँडशी भारताची लढत होती.  त्यावेळी विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस.राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, टीम इंडियाने हे सर्वाच्या मनाला भिडणारं कृत्य केलं होतं. तेव्हापासून खेळाच्या इतिहासात प्रथमच, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी क्रिकेट संघाने ODI जर्सीवर त्यांच्या आईचे नाव लिहिणे सुरू केले. मदर्स डेच्या विशेष प्रसंगी मेन इन ब्लूचा या अद्भुत गोष्ट पुन्हा जिवंत करूया.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमवेत नाणेफेकीच्या वेळी बोलताना महान क्रिकेटपटू धोनी म्हणाला होता की, 'आईचे योगदान' हे सैनिकासारखेच महत्त्वाचे आहे. न्यूझीलंड2016-17 च्या मोसमात आशियाई देशाच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केलेल्या या भावनिक कृत्याचं सर्व देशवासियांनी स्वागत केलं होतं. या सामन्याविषयी बोलायचं म्हटलं तर, धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मालिकेत विजय मिळवला होता.

भारतीय फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्माने 65 चेंडूत 70 धावा तडकावल्या, तर भारताचा माजी कर्णधार कोहलीने 76 चेंडूत 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यष्टिरक्षक-फलंदाज धोनीने 59 चेंडूत 41 धावा केल्या तर केदार जाधव 37 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला. रोहित आणि कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने 50 षटकात सहा विकेट गमावत 269 धावा केल्या होत्या.

विशाखापट्टणम येथे मालिकेतील निर्णायक सामन्यात  आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना,विल्यमसनच्या न्यूझीलंडला केवळ 79 धावा करता आल्या. 5व्या एकदिवसीय सामन्यात 18 धावांत 5 बळी घेणारा फिरकीपटू अमित मिश्राला सामनावीर आणि मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी