Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी? खुद्द क्रिकेटरने दिले याचे उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 21, 2022 | 11:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये तर जबरदस्त कामगिरी करत आहे मात्र कसोटी खेळण्याची संधी अद्याप त्याला मिळालेली नाही. आता सूर्याने कसोटी खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. 

suryakuamar yadav
Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी?  
थोडं पण कामाचं
  • सूर्यकुमार यादव टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवत आहे मात्र आतापर्यंत त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
  • आता कसोटी क्रिकेटबाबत सूर्याने मोठे विधान केले आहे.
  • सूर्यकुमारने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध(india vs new zealand) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने(surya kumar yadav) आपला परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली. सूर्यकुमार यादवने किवी गोलंदाजांची धुलाई करताना केवळ 51 बॉलमध्ये नाबाद 111 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान सूर्याने 11 चौकार आणि सात षटकार ठोकले. सूर्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताला हा सामना 65 धावांनी जिंकता आला. 

अधिक वाचा - हार्ट अटॅक येण्यााधी 1 महिना अगोदर शरीर देते हे 11 लक्षणे

सूर्यकुमार यादव टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवत आहे मात्र आतापर्यंत त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता कसोटी क्रिकेटबाबत सूर्याने मोठे विधान केले आहे. असे नाही की सूर्याचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड खराब आहे. सूर्यकुमारने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. सूर्याने आतापर्यंत फर्स्ट क्लास सामन्यात साधारण 44च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. 

मला लवकर टेस्ट कॅप मिळेल

सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या पत्रकार परिषदेत सांगितले, जेव्हा मी क्रिकेट खेळणे सुरू केले होते तेव्हा लाल बॉलनेच सुरूवात केली होती आणि मी मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत आलो आहे. मी कसोटी प्रकाराबाबत चांगले जाणतो. मी या दीर्घ काळच्या क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. मला आशा आहे की लवकरच कसोटी कॅप मिळेल. 

सूर्यकुमारने खूप उशिरा पदार्पण केले. त्याचा खेळ पाहता त्याने खूप आधी पदार्पण करायला हवे होते. मी अनेकदा माझ्या भूतकाळाबद्दल बोलत असतो. मी जेव्हा माझ्या रूममध्ये असतो अथवा पत्नीसोबत प्रवास करत असतो तेव्हा आम्ही दोन ते तीन वर्षे आधीच्या काळाबद्दल बोलत असतो. आज परिस्थिती कशी आहे आणि तेव्हाचा आणि आजचा माझ्यात काय फरक आहे आम्ही याबाबत अनेकदा बोलत असतो. 

निश्चितपणे त्यावेळेस थोडा निराश झालो होतो. मात्र मी नेहमीच या गोष्टीवर लक्ष दिले आहे की जर काही सकारात्मक आहे तर आपल्याला त्याकडे लक्ष दिले पाहिजे. मी कसा चांगला क्रिकेटर बनू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो. त्यावेळेस मी विविध गोष्टी आजमावल्या. जसे की चांगले जेवण करणे, सराव सत्राला पुरेसा वेळ देणे, योग्य वेळेस झोपणे, याचा मला आज फायदा होत आहे. 

अधिक वाचा - दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा

सूर्या आपल्या बॅटिंगबाबत आहे हैराण

सूर्यकुमारने स्वीकारले की त्याचे काही स्ट्रोक त्यालाच हैराण करतात. मात्र त्याने कधीच क्रिकेटपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी जेव्हा माझ्या रूममध्ये जातो आणि सामन्याचे क्लिप्स पाहतो तेव्हा माझे शॉट पाहून मलाच हैराण व्हायला होते. मी चांगली कामगिरी करो वा न करो मी नेहमी सामन्याचे काही पॉईंट्स जरूर पाहतो. मात्र हे खरे आहे की मी काही स्ट्रोक पाहून हैराण होतो.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी