मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज(india vs west indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील(one day series) तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवला जात आहे. शिखर धवनच्या(shikhar dhawan) नेतृत्वात भारतीय संघाने(indian team) मालिका आधीच २-० अशी आपल्या नावे केली आहे. त्यामुळे आजचा सामना खरंतर औपचारिकतेचा असणार आहे. दरम्यान, निकोलस पूरनच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघ(west indies team) मालिकेत उरला सुरला सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघ एकीकडे क्लीन स्वीपच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे यजमान संघ एकमेव विजयासाठी प्रयत्न करेल. when, where and how to watch india vs west indies third one day match
अधिक वाचा - नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीने करा नागांची पूजा
टीम इंडियाने पहिला वनडे सामना ३ धावांनी जिंकला होती. त्यानंतर दुसऱ्या वनडेत पाहुण्या संघाने ८ विकेट गमावत ३१२ धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिका आपल्या नावे केली. आज भारतीय संघ विंडीजला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने उतरेल. जाणून घेऊया भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामन्याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही कुठे, कधी आणि कसे पाहू शकता.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना आज २७ जुलैला खेळवला जाणार.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स ओव्हल पार्क मैदानात खेळवला जाणार.
भारत-वेस्ट इंडिज तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. टॉस संध्याकाळ ६.३० वाजता होईल.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडेचे लाईव्ह प्रसारण चाहते भारतात फॅन कोड अॅपवर पाहू शकतात. यासोबतच डीडी स्पोर्ट्सवरही होईल.
अधिक वाचा - भाजपला शिवसेना संपवायची आहे -उद्धव ठाकरे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅन कोड अॅपवर पाहू शकता.