IND vs SA 1st T20I Live Cricket Streaming: कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला टी-२० सामना 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 09, 2022 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 1st T20I Live Cricket Streaming । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला असून, ऋषभ पंतच्या हाती संघाची कमान आली आहे.

When, where and how to watch the first T20 match between India and South Africa
कधी, कुठे आणि कसा पाहायचा IND vs SA पहिला टी-२० सामना   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.
  • भारताने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
  • भारतीय संघ ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणार आहे.

IND vs SA 1st T20I Live Cricket Streaming । मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला असून, ऋषभ पंतच्या हाती संघाची कमान आली आहे. तर हार्दिक पांड्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सलग १३ वा टी-२० सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ज्यामध्ये युवा खेळाडूंवर महत्त्वाची जबाबदारी असेल. चला तर म जाणून घेऊया भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? (When, where and how to watch the first T20 match between India and South Africa). 

अधिक वाचा : 'ते' भाषण म्हणजे लवंगीच्या फुसक्या माळा

आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेत भारताचे वर्चस्व

भारताने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेकवेळा दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १५ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामधील भारताने ९ आणि दक्षिण आफ्रिकेने ६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील एकही सामना आतापर्यंत बरोबरीचा राहिला नाही. या मालिकेतही भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व असेल असे या आकडेवारीवरून दिसून येते.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला टी-२० सामना कधी खेळवला जाईल?

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना गुरूवारी ९ जून २०२२ रोजी खेळवला जाईल.

पहिला टी-२० सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होणारा पहिला टी-२० सामना नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल आणि नाणेफेक ६.३० वाजता होईल. 

सामन्याचे लाईव्ह प्रेक्षपण कुठे पाहायचे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स २ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी एचडी वर थेट प्रसारित केला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी