IND vs ENG 2nd ODI Live Cricket Streaming: कुठे, कधी आणि कसा पाहाल भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 14, 2022 | 12:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs England, IND vs ENG 2nd Odi Live Cricket Score Streaming Online: भारत आणि इंग्लंड यांच्यातील आज तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना लॉर्ड्समध्ये खेळवला जाणार आहे. भारताने पहिला वनडे सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

india vs england
IND vs ENG: कुठे, कधी आणि कसा पाहाल भारत-इंग्लंड दुसरी वनडे 
थोडं पण कामाचं
  • भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज
  • लॉर्ड्सवर खेळवला जाणार भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना
  • कधी, कुठे आणि कसा पाहाल या सामन्याचे लाईव्ह प्रसारण

मुंबई: भारत आणि इंग्लंड(india vs england) यांच्यात आज तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर(lords) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होईल. टॉस संध्याकाळी ५ वाजता होईल. टीम इंडियाने(team india) द ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेतत १० विकेटनी विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली यात भारताने २-१ असा विजय मिळवला. where and when to watch india vs england second odi live match

अधिक वाचा - श्रावणात शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नका या ५ गोष्टी

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १०४ वनडे सामने खेळवण्यात आले. यात भारतीय संघाने ५६ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ४३ सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवलाय. तीन सामन्यांचे निकाल लागू शकलेले नाहीत. तर दोन सामने अनिर्णीत राहिले. शेवटचा भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामना द ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता यात भारतीय संघाने १० विकेटनी विजय मिळवला होता. दोन्ही देशांदरम्यान गेल्या पाच वनडे सामन्यांच्या निर्णयावर पाहिले असता इंग्लंडने तीन तर भारताने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. जाणून घेऊया भारत आणि इंग्लड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी, कसा आणि कुठे पाहता येईल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कधी खेळवला जाईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज १४ जुलैला गुरूवारी खेळवला जाईल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठे खेळवला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार. 

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होईल. 

अधिक वाचा - मुसळधार पाऊस, पुरामुळे अनेक ट्रेन रद्द, पाहा यादी

इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या वनडेचे लाईव्ह प्रसारण कोणत्या चॅनेलवर प्रसारित होईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्सवर होईल. तुम्ही सोनी स्पोर्ट्स १ आणि सोनी स्पोर्ट्स १ एचडीवर सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी