Arun Lal-Bulbul saha Honeymoon:हनीमूनला कुठे जाणार अरूण लाल आणि बुलबुल साहा? उत्तर दिले असे काही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 04, 2022 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

पत्रकारांनी अरूण लाल आणि बुलबुल साहा यांच्या हनीमूनबाबत प्रश्न विचारला. यावर माजी क्रिकेटर अरूण लालने आपल्या उत्तराने साऱ्यांनाच हैराण केले.

arun lal - bulbul saha
हनीमूनला कुठे जाणार अरूण लाल आणि बुलबुल? उत्तर दिले असे काही 
थोडं पण कामाचं
  • लग्नानंतर अरूण लाल यांना त्यांच्या हनीमून प्लानबाबत विचारण्यात आले.
  • यावर माजी क्रिकेटर अरूण लाल यांनी आपल्या उत्तराने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले.
  • अरूण लाल हे बंगाल क्रिकेट टीमचे हेड कोच आहेत. 

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर अरूण लाल(Arun Lal) सध्या आपल्या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. नुकतेच ६६ वर्षीय अरूण लाल यांनी आपल्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहाशी(Bulbul Saha) लग्न केले. अरूण लाल(Arun Lal)आणि बुलबुल लाहा(Bulbul Saha) यांनी सोमवारी कोलकातामध्ये लग्न केले होते. 

अधिक वाचा - बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ईदच्या फोटोंवरून ट्रोल

हनीमूनसाठी कुठे जाणार अरूण लाल आणि बुलबुल साहा?

लग्नानंतर अरूण लाल यांना त्यांच्या हनीमून प्लानबाबत विचारण्यात आले. पत्रकारांनी अरूण लाल आणि बुलबुल साहा यांना त्यांच्या हनीमूनबाबत विचारले यावर माजी क्रिकेटर अरूण लाल यांनी आपल्या उत्तराने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. अरूण लाल हे बंगाल क्रिकेट टीमचे हेड कोच आहेत. 

अरूण लाल यांच्या उत्तराने सारे हैराण

अरूण लाल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले, रणजी ट्रॉफीच आमचा हनीमून आहे. ४ जून ते ८ जून दरम्यान रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये बंगालचा संघ झारखंडसोबत सामने खेळेल.  हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या सामन्यात बुलबुल साहा आपले पती अरूण लाल यांच्यासह बंगला संघाला चीअरअप करताना दिसणार आहे.

अरूण लाल यांनी का केले दुसरे लग्न?

अरूण लाल यांनी वयाच्या ६६व्या वर्षी बुलबुल साहा हिच्याशी लग्न केले. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. अरूण लालने याआधी रीनाशी लग्न केले. रीनाने त्यांना दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. रीना दीर्घकाळापासून आजारी आहे. ती पतीच्या दुसऱ्या लग्नाने खुश आहे.

अधिक वाचा - Foods For Hemoglobin : भरपूर हीमोग्लोबिन पुरविणारे पदार्थ

भारतासाठी २९ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत अरूण लाल

अरूण लाल यांनीन १९८२ ते ८९ दरम्यान त्यांनी भारतासाठी एकूण १६ कसोटी आणि १३ वनडे सामने खेळलेत. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून कसोटीत ७२९ आणि वनडेमध्ये १२२ धावा झाल्यात. कसोटीत त्यांच्या बॅटने सहा अर्धशतके आणि वनडेत एक अर्धशतक आले आहे. अरूण लाल यांचा जन्म ११९५५मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये झाला. अरूणने कॉमेंट्रीमध्येही नशीब आजमावले. मात्र २०१६मध्ये त्यांना कॅन्सर झाला. यानंतर त्यांनी कॉमेंट्री करणे सोडून दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी