वर्ल्ड कपनंतर मोठा धमाका करणार युवराज सिंह?  निवृत्तीपूर्वी म्हटले असे काही 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

युवीच्या चाहत्यांना एका गोष्टीची खंत आहे, की या फायटर खेळाडूला शोभेल असा निरोप देण्यात आला नाही. पण जाता जाता युवी असे खुलासे करून गेला ज्याबाबत कोणाला माहिती नव्हतं. 

Yuvraj singh
युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर  |  फोटो सौजन्य: IANS

नवी दिल्ली :  भारतीय फॅन्सला अनेक आठवणीचे आणि गौरवाचे क्षण देणाऱ्या सिक्सर किंगने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. युवराज सिंग निवृत्तीची घोषणा करताना खूप भावुक झाला होता.  या दरम्यान क्रिकेटला 'अलविदा' म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. युवीच्या चाहत्यांना एका गोष्टीची खंत आहे, की या फायटर खेळाडूला शोभेल असा निरोप देण्यात आला नाही. पण जाता जाता युवी असे खुलासे करून गेला ज्याबाबत कोणाला माहिती नव्हतं.  

युवीने मुंबईमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा करतना म्हटले की त्याला खूप काही बोलायचे आहे. पण टीम इंडिया यावेळी वर्ल्ड कप खेळते आहे, त्यामुळे या दरम्यान कोणताही वाद मला नको आहे. युवी सारख्या चॅम्पियन खेळाडूचे म्हणणे आहे की सांगण्या सारख्या अनेक गोष्टी आहेत, त्याला कशी वागणूक देण्यात आली. जेव्हा युवी रिटायरमेंट स्पीच देत होता तेव्हा त्याचे हावभाव सर्व काही सांगत होते. की त्याच्या मनात काही इच्छा आहे, जी अपूर्ण राहिली आहे.  पण त्याच्या बाबतीत नशीबाने असा खेळ खेळला की त्या ज्या पद्धतीने निरोप द्यायला हवा होता, तसा त्याला मिळू नाही शकला. 

युवराजने रिटायरमेंट स्पीचमध्ये म्हटले की, आता माझ्याकडे या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ असेल आणि माझ्याकडे बोलण्यासाठी भरपूर काही आहे. आता मी काही बोलू इच्छित नाही. कारण भारत वर्ल्ड कप खेळत आहे आणि मला खेळाडूंच्या आसपास कोणताही वाद नको आहे. मला वाटते की भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चांगल्या गतीने पुढे जात आहे. मला वाटते की बोलण्यासाठी माझी वेळही येणार आहे. वर्ल्ड कपच्या कालावधीत रिटायर झालो असे नाहीत  मला स्वतः वाटते की जीवनात पुढे जाण्यासाठी रिटायर झालो आहे. मला आतापण वाटते की या सर्व गोष्टींवर भाष्य करायला मला संधी मिळेल. 

या भाषणावेळी युवीने काही संकेत दिले काही गोष्टी सांगण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. पण त्याचे चाहत्यांना त्याला जे काही बोलायचे ते समजले, पण ते युवीच्या तोंडून सर्व काही ऐकण्यास इच्छूक आहे.  त्याला काही धमाका करायचा आहे हे त्याने आताच सांगितले नाही. पण त्याची वेळ येईल तेव्हा तो धमाका करणार आणि सर्व गोष्टींवरून पडदा उठविणार हे निश्चित आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी