Sajid khan: कोण आहे हा साजिद खान? विकेट घेतल्यावर करतो शिखर धवनची नक्कल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 08, 2021 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sajid Khan record performance, Bangladesh vs Pakistan 2nd test: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या ढाका येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानी स्पिनर साजिद खानच्या जबरदस्त कामगिरीने सारेच हैराण झाले. 

sajid khan
कोण आहे हा साजिद खान? विकेट घेतल्यावर करतो शिखर धवनची नक्कल 
थोडं पण कामाचं
  • कोण आहे हा पाकिस्तानी क्रिकेटर साजिद खान?
  • ढाकामध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कहर
  • आपल्या चौथ्या कसोटीत सामन्यात सोडली छाप

Who is Sajid Khan, BAN vs PAK 2nd Test:ढाकामध्ये यजमान बांगलादेश(bangladesh vs pakistan test match) आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यावर सातत्याने पावसाचे ढग आहेत मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी बराच खेळ करणे शक्य झाले. चौथ्या दिवशी पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तानी संघाने आपला पहिला डाव ४ बाद ३०० धावांवर घोषित केला. यानंतर बांगलादेशचा संघ उत्तर देण्यास मैदानात उतरला. तेव्हा पाकिस्तानी स्पिनर साजिद खानचा(pakistani spinner sajid khan) कहर त्यांना पाहायला मिळाला. जाणून घ्या कोण आहे हा स्पिनर...who is pakistani spiner sajid khan? know all about him

या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे कोणताही खेळ होऊ शकला नाही. सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी उतरलेल्या पाकिस्तानी संघाने मंगळवारी आपला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आझम(७६), अजहर अली(५६), फवाद आलम(नाबाद ५०) आणि मोहम्मद रिझवान(५३) यांच्या खेळीच्या जोरावर ४ बाद ३००वर डाव घोषित केला. 

साजिदसमोर बांगलादेशने टेकले गुडघे

जेव्हा यजमान बांगलादेशचा संघ हे आव्हान घेऊन मैदानात उतरला तेव्हा पहिल्या डावात पाकिस्तानचा स्पिनर साजिद खानचा कहर पाहायला मिळाला. आपल्या टेस्ट करिअरमधील चौथ्या सामन्यात या स्पिनरने जबरदस्त गोलंदाजी केली आणि बांगलादेशच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने केवळ ७६ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. यात साजिद खानच्या नावावर ६ विकेट होत्या. या स्पिनरने आतापर्यंत १२ ओव्हरमध्ये ३ मेडन ओव्हर टाकत ३५ धावा देत ६ विकेट घेतल्यात. 

Sajid Khan

कोण आहे साजिद खान?

पाकिस्तानसाठी आपला चौथा कसोटी सामना खेळणारा साजिद खानचा जन्म ३ सप्टेंबर १९९३ला झाला होता. या खेळाडूने ऑक्टोबर २०१६मध्ये पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर क्रिकेट खेळत पेशावरकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने लिस्ट ए आणि टी२० करिअरचीही सुरूवात केली. या वर्षी जानेवारीमध्ये तो पाकिस्तानचा फर्स्ट क्लास श्रेणीतील अव्वल क्रिकेटर ठरला. त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यााठी टेस्ट टीममध्ये संधी मिळाली मात्र त्याला खेळवले नाही. एप्रिल २०२१च्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर कसोटीत त्याने पदार्पण केले. आपल्या तीन कसोटी सामन्यात एकूण ६ विकेट घेणाऱ्या साजिदने मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या.

Shikhar Dhawan kabaddi style celebration

शिखर धवनसारखा जल्लोष 

साजिद खानवर भारताचा दिग्गज क्रिकेटर शिखर धवनचा प्रभाव दिसतो. तो धवनसारख्या मिशा ठेवतो. तसेच त्याच्याच अंदाजात मैदानावर जल्लोष करतो. ज्या पद्धतीने शिखर धवन कोणताही कॅच घेतल्यानंतर जल्लोष करतो तसेच काहीसे साजिद खानही करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी