मुंबई: टीम इंडियाचा(team india) जबरदस्त फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली(virat kohli) गेल्या काही महिन्यांपासून कठीण काळातून जात होता. त्याच्या बॅटमधून शतक निघण्यास तब्बल तीन वर्षे लागली. आशिया कप 2022मध्ये(asia cup2022 ) त्याला लय सापली आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या(afganistan) सामन्यात त्याने शतक ठोकले. टी20 वर्ल्ड कप-2022मध्ये(t-20 world cup 2022) तर त्याने धमाल केली. दरम्यान, टीम इंडियाला(team india) मात्र सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला आणि ते स्पर्धेतून बाहेर झाले. who is phone a friend of virat kohli?
अधिक वाचा - बाजीप्रभूंचे वंशज 'हर हर महादेव' सिनेमावर का संतापले?
यातच विराट कोहलीच्या खास मित्राने एक गोष्ट सांगितली आहे. या मित्राचे नाव तर सारेच जाणतात - एबी डेविलियर्स. द. आफ्रिकेच्या या दिग्गज क्रिकेटरने सांगितले की विराट कोहलीच्या कठीण काळात तो नेहमी त्याच्यासोबत होता. क्रिकेटच्या दुनियेत विराट आणि एबीची मैत्री ही शोले सिनेमाच्या जय-वीरूपेक्षा कमी मानली जात नाही. क्रिकेटच्या मैदानावर आणि बाहेरही दोघांशी संबंधित अनेक किस्से आहेत. सोशल मीडियावर दोघांचे फोटोज अनेकदा व्हायरल होतात.
एबी डेविलियर्समे सगळ्यांच्या समोर विराटबाबत एक गोष्ट सांगितली आहे. त्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले, मी विराटबद्दल खूप खुश आहे. तो नुकताच मोठ्या कठीण काळातून गेला. मी त्यावेळेस त्याच्या संपर्कात होतो. त्याला नेहमी प्रोत्साहित करत होतो. तो माझा चांगला मित्र आहे. जेव्हा विराटने आपले आंतरराष्ट्रीय करिअरमधील 71 वे शतक ठोकले होते तेव्हा एबीने त्याचे जबरदस्त कौतुक केले होते. आयपीएलच्या दिवसांपासूनच विराट आणि एबी चांगले मित्र आहेत. दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी दीर्घकाळापासून खेळले आहेत.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये धमाल केली. तब्बल तीन वर्षे शतकासाठी संघर्ष करणाऱ्या विराटने आशिया कप 2022मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. विराटने वर्ल्डकपमध्येही चांगलीच कामगिरी केली. त्याने येथील 6 सामन्यात 98.67 च्या सरासरीने एकूण 296 धावा केल्या.
अधिक वाचा - म्हातारपणात प्रेमात वेडी झालेल्या महिलेनं पतीची केली हत्या
विराटने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला. विराट टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.त्याने अव्वल स्थानी असलेल्या महेला जयवर्धनेला मागे टाकत हा रेकॉर्ड केला.