IPL 2022 : मेगा लिलावाआधी या २ खेळाडूंचा दावा मजबूत, बनू शकतात Ahmedabad टीमचे कॅप्टन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2021 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल २०२२ मेगा लिलावाआधी अहमदाबादला एक मजबूत टीम तयार करायची आहे. ज्यासाठी चांगल्या कॅप्टनचा शोध सुरू आहे. 

ipl 2022
IPL 2022 : हे बनू शकतात Ahmedabad टीमचे कॅप्टन 
थोडं पण कामाचं
  • कोण होणार अहमदाबादचा कर्णधार
  • २ आंतरराष्ट्रीय स्टारमध्ये आहे कडवी टक्कर
  • सीव्हीसी कॅपिटलने खरेदी केली फ्रेंचायजी

मुंबई: आयपीएल २०२२ मेगालिलावाआधी(IPL 2022 Mega Auction) नवी टीम अहमदाबाद(Ahmedabad)फ्रेंचायजी अशी टीम बनवण्याचा प्रयत्न करत आहे जे त्यांना पुढील वर्षी खिताब जिंकून देईल. सीव्हीसी कॅपिटलने (CVC Capital)ने ५१६६ कोटी रूपयांना या टीमचे मालकी हक्क मिळवले आहेत. who will be the next ahmedabad captain in ipl 2022

या दोन खेळाडूंमध्ये होणार कर्णधारपदासाठी झुंज

सीव्हीसी कॅपिटल एक आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट फर्मआहे ज्यांनी आयपीएलच्या नव्या टीम्ससाठी दुसरी मोठी बोली लावली होती. या टीमचे होम ग्राऊंड नरेंद्र मोदी स्टेडियम असेल. जाणून घ्या असे कोणते आहेत दोन प्लेयर्स जे अहमदाबाद टीमचे कॅप्टन बनू शकतात. 

डेविड वॉर्नर

सनरायजर्स हैदराबादच्या डेविड वॉर्नरचे बाय बाय निश्चित आहे. तसेच या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने सांगितलेही आहे की तो लिलावात असणार आहे. अशातच अहमदाबादचे नेतृत्व त्याच्या हाती दिले जाऊ शकते. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४१.५९च्या सरासरीने आणि १४०च्या स्ट्राईक रेटने ५४४९ धावा केल्या आहेत. यात ४ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेशआहे. आयपीएल २०२१मध्ये हैदराबादची कामगिरी खूपच खराब राहिली. याचा भुर्दंड वॉर्नरला भोगावा लागला. त्यामुळे त्याला कर्णधारपदही सोडावे लागले तसेच प्लेईंग ११मधील जागाही. त्यामुळे वॉर्नरला हैदराबादचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. 

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर पुढील वर्षी वेगळ्या संघाकडून खेळताना आढळू शकतो कारण त्याला नेतृत्व माहीत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायजी सध्या ऋषभ पंतला कर्णधार बनवण्याच्या मूडमध्ये आहे. अशातच जर अय्यर ऑक्शन पूलमध्ये आला तर अहमदाबाद संघ त्याच्यावर बोली लावू शकतो. अय्यरने २०२०मध्ये आपल्या नेतृत्वात दिल्लीला पहिल्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवले होते. अहमदाबादचा मालक लाँग टर्म इंडियन कॅप्टनचा शोध घेत अेल तर २६ वर्षीय अय्यर चांगली चॉईस ठरू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी