ENG vs IND : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताकडून सलामीला कोण येणार, उत्तरात बीसीसीआयने पोस्ट केला VIDEO

भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिका अनिर्णीत सुटल्यानंतर आता भारत आयर्लंड दौऱ्यावर जाणार. पण त्यानंतर लगेचच वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने खेळताना दिसणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे.

Who will be India's opener for England tour?
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताकडून सलामीला कोण येणार?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शुभमनने याआधी देखील रोहितसोबत सलामीला आला आहे.
  • आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्स संघाकडूनही शुभमनने चांगली कामगिरी केली होती.

ENG vs IND : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिका अनिर्णीत सुटल्यानंतर आता भारत आयर्लंड दौऱ्यावर जाणार. पण त्यानंतर लगेचच वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने खेळताना दिसणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वीच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा सलामीवीर आणि महत्त्वाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे या सामन्यांना मुकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुलच्या जागी कोणता खेळाडू येणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आता ही जागा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) घेणार हे दिसून येत आहेत. 

या मागील कारण म्हणजे बीसीसीआयने पोस्ट केलेला एक व्हिडीओ. बीसीसीआयने अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये शुभमन आणि रोहित दोघे सराव करत असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने भारतीय सलामीवीर असं लिहिल्याने आता शुभमनच सलामीला उतरेल हे फिक्स झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे शुभमनने याआधी देखील रोहितसोबत सलामीला आल्याचं पाहायाला मिळालं आहे. त्यात यंदा आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्स संघाकडूनही शुभमनने चांगली कामगिरी केली होती. त्याने 16 सामन्यात 483 धावा केल्या. 96 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही तो पाचवा राहिला. दरम्यान या सर्वामुळे रोहितसोबत शुभमनच सलामीला उतरण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असावा.

भारतीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी