T20 वर्ल्डकपपूर्वी या ३ देशांचा दौऱ्यासह आशिया कप खेळणार टीम इंडिया, पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 21, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team india: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका संपल्यानंतर भारत आता आयर्लंड आणि इंग्लंड दौरा करत आहे. यानंतर टीम इंडिया कॅरेबियन धरतीवर लिमिटेड ओव्हरची मालिका खेळणार आहे. 

team india
India: T20 वर्ल्डकपआधी या ३ देशांचा दौरा, आशिया कप खेळणार... 
थोडं पण कामाचं
  • मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात एक भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
  • वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.
  • भारत आयर्लंडविरुद्ध २६ आणि २८ जूनला दोन सामन्यांची टी-२०मालिका खेळणार आहे.

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचे काही खेळाडू आयर्लंडविरुद्ध टी-२० खेळण्यासाठी रवाना होतील. तर काहीजण इंग्लंडसाठी उड्डाण करतील. आगामी काही महिने भारताचे खेळाडू खूप व्यस्त राहणार आहेत. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडिया श्रीलंकेता आशिया कप खेळण्यासोबतच तीन देशांचा दौरा करणार आहे. वर्ल्डकपआधी भारत केवळ ऑस्ट्रेलियाचे यजमानपद सांभाळेल. जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक...

अधिक वाचा - 

अग्निपथ : अनेक निर्णय राष्ट्र उभारणीत लाभदायक - पंतप्रधान

अग्निपथ : अनेक निर्णय राष्ट्र उभारणीत लाभदायक - पंतप्रधान

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात एक भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.  तर वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. भारत आयर्लंडविरुद्ध २६ आणि २८ जूनला दोन सामन्यांची टी-२०मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध रिशेड्यूल्ड झालेली एकमेव कसोटी खेळणार. या सामन्यानंतर भारताला इंग्लंड संघाविरुद्ध तीन टी-२० आणि तितकेच टी-२० सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंड दौऱ्याचा शेवट १७ जुलैला होणार आहे. 

इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडेसह ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजचा दौरा २२ जुलैपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. 

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला २० दिवसांचा ब्रेक मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार २७ ऑगस्टपासून ते ११ सप्टेंबरपर्यंत आशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या वेळेस आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. 

अधिक वाचा - आनंद सेना स्थापन करणार एकनाथ शिंदे? वाचा सविस्तर

आशिया कप स्पर्धेनंतर भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे यजमानपद भूषवणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, या मालिकेच्या तारखा अद्याप समोर आलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियासोबत ही मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२२साठी ऑस्ट्रेलियासाठी फ्लाईट पकडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी