उर्वशी रौतेला 'मिस्टर RP'बद्दल बोलल्याने भडकला ऋषभ पंत? 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 11, 2022 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh Pant deleted Insta story: उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत मिस्टर आरपीबद्दल विधान केले. याचा संबंध ऋषभ पंतशी जोडला जात आहे. तर पंतची एक डिलीटेड पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 

urvashi routella
उर्वशी रौतेला 'मिस्टर RP'बद्दल बोलल्याने भडकला ऋषभ पंत?  
थोडं पण कामाचं
  • उर्वशी आणि पंत आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत
  • याचे कारण म्हणजे या अभिनेत्रीने एका मुलाखतीत मिस्टर आरपी बद्दल विधानकेले.
  • उर्वशीने ही मुलाखत बॉलिवड हंगामाला दिली होती

मुंबई: भारतीय क्रिकेटर्स(indian cricketers) आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या(bollywood actres) अफेअरची चर्चा अनेकदा होत असते. दरम्यान, काही जोड्या तर या अफेयरला दुजोराही देत नाहीत. अशीच दोन नावे आहेत ती म्हणजे ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला. दोघांचे अफेयर असल्याच्या अफवा २०१८मध्ये आल्या होत्या. तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला की दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपापसातील संमतीनंतर वेगळे झाले होते. या दरम्यान ही बातमीही आली की पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. why rishabh pant take a dig on  Urvashi routela

अधिक वाचा - बीड: गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा

उर्वशी रौतेलाने केले मिस्टर आरपीबद्दल विधान

दरम्यान, उर्वशी आणि पंत आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे या अभिनेत्रीने एका मुलाखतीत मिस्टर आरपी बद्दल विधानकेले. उर्वशीने ही मुलाखत बॉलिवड हंगामाला दिली होती. ही मुलाखत सोशलमीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिने मुलाखतीत घेतलेल्या मिस्टर आरपी नावाला लोक ऋषभ पंतशी जोडत आहेत. 

उर्वशीने आपल्या मुलाखतीत काय म्हटले?

अभिनेत्रीने आपल्या मुलाखतीत म्हटले, मी वाराणसीमध्ये शूटिंग करत होते. त्यानंतर दिल्लीमध्ये माझा एक शो होता. तेथून फ्लाईटने मी दिल्लीला आले. दिललीमध्ये १० तासांची शूटिंग झाल्यानंतर जेव्हा मी परत आले तेव्हा मला तयार व्हायचे होते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मुलींना तयार व्हायला किती वेळ लागतो. तेव्हा मिस्टर आरपी मला भेटण्यास आले होते. ते लॉबीमध्ये बसून माझी प्रतीक्षा करत होते आणि त्यांना मला भेटायचे होते. मी खूप थकले होते, यामुळे मला झोप येत होती. मला नव्हते माहीत की इतके सारे कॉल्स होते. जेव्हा मी उठून पाहिलं तेव्हा १६-१७ मिस्ड कॉल होते. मला वाईट वाटले की माझी कोणीतरही प्रतीक्षा करत होतं आणि मी गेले नाही. 

Rishabh Pant Instagram Story

अधिक वाचा - Asia Cup: बुमराहनंतर आणखी एक खेळाडू आशिया कपमधून बाहेर

भडकला ऋषभ पंत

उर्वशीच्या या मुलाखतीनंतर ऋषभ पंत चांगलाच भडकला आणि त्याने अभिनेत्रीवर खोटे बोलल्याचा आरोप केला. पंतची ही प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे. पंतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी टाकी आणि ती त्याने १० मिनिटांनी डिलीटही केली. पंतने डिलीटेड पोस्टमध्ये लिहिले की हे खूप फनी आहे. काही लोक थोडीफार लोकप्रियता मिळवण्यासाठी चर्चेत येण्यासाठी मुलाखतीत खोटे बोलतात. हे खरंच दुख:दायक आहे की काही लोक फेम आणि नेमसाठी खूप हावरे आहेत. देवाची कृपा त्यांच्यावर राहो. हॅशटॅगममध्ये मेरा पीछाछोडो बहन. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी