रोहित शर्माला Team india चा कर्णधार का केलं? BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा खुलासा

BCCI President Sourav Ganguly revealed : विराट कोहलीच्या माघारीनंतर नवीन मर्यादित षटकांचा भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्माची का नियुक्ती करण्यात आली, याबाबत अध्यक्ष सौरव गांगुलीने खुलासा केला आहे.

 Why Rohit Sharma was made the captain of Team India, BCCI President Sourav Ganguly revealed
रोहित शर्माला Team india चा कर्णधार का केलं, BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा खुलासा ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कर्णधारपदावरून सुरू असलेल्या वादांमध्ये भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला.
  • विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा वाद आणि त्यावर प्रश्नोत्तरांची प्रक्रिया सुरूच
  • सौरव गांगुली यांने रोहित शर्माची लगेचच कर्णधारपदी नियुक्ती का करण्यात आली हे सांगितले

BCCI President Sourav Ganguly revealed मुंबई : टीम इंडियाचा (Team india) कर्णधार (captain) विराट कोहलीने सप्टेंबरमध्ये T20 विश्वचषक 2021 नंतर अचानक घोषणा केली की तो भारतीय T20 संघाच्या कर्णधारपदा सोडत आहे. तेव्हा BCCI ने लगेचच रोहित शर्माचे (Rohit Sharma)T20 कर्णधार म्हणून नाव जाहीर केले. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली, तेव्हा विराट कोहलला (virat kohli) मोठा धक्का बसला कारण भारतीय क्रिकेट बोर्डाने विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपदही देण्यात आले. (Why Rohit Sharma was made the captain of Team India, BCCI President Sourav Ganguly revealed)

तेव्हापासून विराट कोहलीला याबाबत माहिती देण्यात आली नसल्याची सर्व प्रकारची विधाने आणि चर्चा सुरू आहेत, त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोच्च स्तरावर इतके काही घडले आहे की टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठ्या दौऱ्यावर पोहोचली आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कर्णधारपदावरून सुरू असलेल्या सर्व वादांमध्ये भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. दरम्यान, विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा वाद आणि त्यावर प्रश्नोत्तरांचे चक्र सुरूच आहे. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी एका मुलाखतीत रोहित शर्माची लगेचच कर्णधारपदी नियुक्ती का करण्यात आली हे सांगितले आहे.

 विराटच्या निर्णयाने गांगुलीला धक्का

विराटने दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी काही विधाने केली, ज्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला धक्का बसला. दादांनी गुरुवारी जाहीर निवेदनात म्हटले आहे की, या वादांवर मला बोलायचे नाही आणि बीसीसीआय हे प्रकरण हाताळेल. पण एका मुलाखतीत त्याने रोहितला कर्णधार बनवण्याबाबत खुलासा केला. 

आयपीएलमध्ये अनेकदा चॅम्पियन

बोरिया मजुमदार यांच्या 'बॅकस्टेज विथ बोरिया' या कार्यक्रमात जेव्हा गांगुलीला रोहितला कर्णधारपद देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने हा निर्णय का घेतला हे सांगितले. तो म्हणाला, "आयपीएलमध्ये मुंबईसाठी पाच जेतेपदे, डेक्कन चार्जर्ससह एक विजेतेपद मिळवणे हे त्याची क्षमता दाखवण्यासाठी पुरेसे आहे. विराटने एकदा ठरवले की त्याला टी-20चा कर्णधारपद नको आहे, तर रोहित शर्मा योग्य पर्या होता आहे. न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने मालिका जिंकूनही त्यांने चांगली सुरुवात केली आहे. आशा आहे की पुढील वर्षीचे निकाल या वर्षीच्या तुलनेत चांगले असतील."


विश्वचषकातील कामगिरीने खूप नाराज

2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने ज्या प्रकारे कामगिरी केली ते देखील विराट कोहलीला दोष देण्याचे मोठे कारण बनले आहे. आयसीसीच्या सर्व प्रमुख टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय बराच काळ निराश होती. याबद्दल बोलताना दादा म्हणाले, "खर सांगायचे तर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 च्या विश्वचषकात आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही विश्वचषक 2019 मध्ये चमकदार कामगिरी केली होती, पण एका दिवसाच्या खराब कामगिरीमुळे दोन महिन्यांची मेहनत खराब झाली. मी खूप निराश आहे. 2021 च्या T20 विश्वचषकात आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याप्रमाणे. गेल्या 4-5 वर्षांतील ही आमची सर्वात खराब कामगिरी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी