T20 World Cup 2021: टीम इंडिया सलग २ सामने का हरली? जसप्रीत बुमराहचा आश्चर्यजनक खुलासा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2021 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India Defeat: टीम इंडियाचा आपल्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा झटका बसला. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आश्चर्यजनक खुलासा केला आहे.

team india
टीम इंडिया सलग २ सामने का हरली? बुमराहचा आश्चर्यजनक खुलासा 
थोडं पण कामाचं
  • बुमराहने केला आश्चर्यजनक खुलासा
  • टीम इंडियाच्या पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया
  • न्यूझीलंडने भारताला हरवले

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(icc t-20 world cup) रविवारी असे काही घडले ज्यामुळे भारतीय चाहत्यांची(indian fans) मने दुखावली गेली. टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ(indian team) आता वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या(world cup semifinal) शर्यतीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. टीम इंडियासाठी आता सेमीफायनलचे दरवाजजे जवळपास बंद झाले आहेत. why team india defeat in t-20 world cup, says bumrah

टीम इंडियाचा आपल्या ग्रुपमध्ये पाकिस्तान(pakistan) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्याकडून पराभव झाला. टीम इंडियाच्या या सलग दुसऱ्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आश्चर्यजनक खुलासा केला आहे. जसप्रीम बुमराहचे म्हणणे आहे की सलग ६ महिन्यांपासून कुटुंबापासून दूर राहणे आणि क्रिकेट खेळणे सोपे नसते. 

बुमरहाने केले अनेक खुलासे

जसप्रीत बुमराहने सांगितले, तुम्हाला अनेकदा ब्रेकची गरज असते. तुम्ही तुमच्या कुटुंबाला मिस करत असता. तुम्ही सहा महिन्यांपासून सातत्याने खेळत आहात. यामुळे या गोष्टी काही ना काही प्रमाण आपल्या मेंदूवर परिणाम करतात. मात्र जेव्हा तुम्ही मैदानावर असता तेव्हा याबाबत विचार करत नाहीत. अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात राहत नाहीत. बबलमध्ये राहणे आणि कुटुंबापासून दूर राहणे ते ही इतक्या दीर्घकाळासाठी. यामुळे खेळाडूच्या मेंदूवर परिणाम होतो. 

न्यूझीलंडविरुद्ध सामना हरल्यानंतर बुमराह म्हणाला, एकदा तुम्ही टॉस गमावल्यानंतर विकेट दुसऱ्या डावात बदलले जातात. यासाठी मला वाटते की आम्हाला गोलंदाजीत थोडा आणखी वाव दिला पाहिजे. फलंदाजांसोबत हीच चर्चा होत होती. आम्ही थोडे लवकर आक्रमक झालो आणि लांब  बाऊंड्रीमुळे  त्रास झाला. त्यांनी स्लो बॉलचा चांगला वापर केला. त्यांनी विकेटचा चांगला वापर केला आणि आमच्या फलंदाजांना मोठे शॉट्स खेळणे कठीण केले. सिंगल्सही येत नव्हते. 

टीम इंडियाच्या पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया

आयसीसी टूर्नामेंट्समध्ये टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहलीचा संयम सुटला. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर कोहली म्हणाला, टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये हिम्मत कमी दिसली आणि बॉडी लँग्वेजही नीट नव्हती. न्यूझीलंडच्या संघाने जो दबाव बनवला तो सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राहिला. भारतीय फलंदाजांच्या वाईट कामगिरीनंतर कोहली म्हणाला, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे फलंदाज मोठे शॉट्स मारण्यास घाबरत होते. यामुळे मोठे शॉट्स खेळताना ते बाद झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी