World cup: टीम इंडिया का हरली होती वर्ल्ड कप २०१९ची सेमीफायनल, युवराजने सांगितले कारण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 05, 2022 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहच्या मते टीम इंडियाने इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्डकप २०१९साठी चांगला प्लान केला नव्हता. 

yuvraj singh
थोडं पण कामाचं
  • वर्ल्डकप २०१९मध्ये भारताच्या बॅटिंग लाईनअपमध्ये, खासकरून चौथ्या नंबरच्या स्लॉटवर समस्या पाहायला मिळाली.
  • अनुभवी फलंदाज अंबाती रायडूला १५ सदस्यी संघातून बाहेर करण्यात आले होते
  • त्याच्या जागी थ्री डायमेंशनल विजय शंकरला स्थान मिळाले होते

मुंबई: भारताचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंहच्या(yuvraj singh) मते टीम इंडियाने(team india) इंग्लंडमध्ये जो वर्ल्डकप २०१९(2019 world cup) खेळवण्यात आला होता त्यांना योग्य प्लानिंग केले नव्हते. चौथ्या नंबरसाठी विजय शंकर(vijay shankar) आणि ऋषभ पंत(rishabh pant) यांच्यातील अदला-बदलीचा हवाला देत युवराजने सांगितले, जर टीम इंडियाकडे चौथ्या नंबरसाठी चांगला अनुभवी फलंदाज असता तर भारताने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली असती. Why team india loose semifinal of 2019 world cup

अधिक वाचा - पुढील 20 दिवस या लोकांवर धनवर्षा, शुक्रामुळे पैशांचा पाऊस

वर्ल्डकप २०१९मध्ये भारताच्या बॅटिंग लाईनअपमध्ये, खासकरून चौथ्या नंबरच्या स्लॉटवर समस्या पाहायला मिळाली. अनुभवी फलंदाज अंबाती रायडूला १५ सदस्यी संघातून बाहेर करण्यात आले होते त्याच्या जागी थ्री डायमेंशनल विजय शंकरला स्थान मिळाले होते मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. इतकंच की स्पर्धेतील काही सामन्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. 

स्पर्धेत केएल राहुल चौथ्या नंबरवर फलंदाजी करत होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर झाल्यानंतर त्याला सलामीला उतरावे लागले आणि टीम इंडियाचे सर्व प्लान उद्ध्वस्त झाले. राहुलला सलामीला पाठवल्यानंतर विजय शंकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये चौथ्या स्थानावर संधी मिळाली मात्र दुखापतीमुळे तो  वर्ल्डकपमधून बाहेर पडला. धवनच्या जागी ऋषभ पंत इंग्लडला पोहोचला मात्र शंकरच्या ऐवजी मयांक अग्रवालला निवडण्यात आले. 

अधिक वाचा - पोटावरची वाढती चरबी कमी करण्याचे ७ सोपे घरगुती उपाय

ऋषभ पंतने चौथ्या स्थानावर अनेक सामने खेळले आहेत. मात्र स्पर्धेच्या अखेरीस जेव्हा भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा चौथ्या नंबरची फलंदाजी ही समस्येची सबब बनली.. युवराजने संजय मांजरेकरला दिलेल्या मुलाखतात म्हटले, जेव्हा आम्ही २०११चा वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा आमच्या सगळ्यांकडे फलंदाजीसाठी एक स्थान देण्यात आले होते. मला २०१९च्या वर्ल्डकपमध्ये असे जाणवले की त्यांनी यासाठी कोणता प्लानच बनवला नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी