virat kohli: सेमीफायनलमध्ये का गेली नाही टीम इंडिया, विराटने सांगितली चूक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 09, 2021 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli on Why India did not qualify for T20 World Cup Semi-Finals: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ च्या सेमीफायनलमध्ये अखेर टीम इंडियाला पोहोचताच आले नाही. सोमवारी नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर विराटने याबाबत सांगितले. 

virat kohli
सेमीफायनलमध्ये का गेली नाही टीम इंडिया, विराटने सांगितली चूक 
थोडं पण कामाचं
  • टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये भारताचे आव्हान संपुष्टात
  • अखेरच्या सामन्यातील विजयानंतर कोहलीने सांगितली चूक
  • अखेर भारत सेमीफायनलमध्ये का नाही पोहोचू शकला. 

Virat Kohli, T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षेसह आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(icc t-20 world cup 2021)मध्ये खेळण्यास उतरला होता. भारतीय संघाकडून साऱ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. कारण संघातील खेळाडूंना यूएईमध्ये आयपीएल खेळण्याचा मोठा अनुभव होता. दरम्यान, त्यानंतरही टीम इंडियाने वर्ल्डकपमधील सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले. अखेर कुठे चुकली टीम इंडिया? दमदार खेळाडू असतानाही टीम इंडियाला सेमीफायनल का गाठता आली नाही? विराट कोहलीने(virat kohli) यावर खुलेपणाने उत्तरे दिली. why team india not reached in semifinal, says virat kohli

दुबईमध्ये नामिबियाविरुद्धच्या सुपर १२ राऊंडमधील अखेरच्या सामन्यात भारताने नामिबियाला ९ विकेटनी हरवले. ययासोबतच भारताचे ५ही सामने संपले आणि स्पर्धेतील त्यांचा प्रवासही. सामन्यानंतर जेव्हा विराट कोहलीशी बातचीत झाली तेव्हा त्यांने अनेक बाबी खुलेपणाने मांडल्या. यात त्याने स्वत:ची चूक मान्य केली ज्यामुळे संपूर्ण स्पर्धा त्याच्यावर भारी पडली आणि भारताला सेमीफायनलही गाठता आली नाही. 

विराट कोहलीने सामन्यानंतर या गोष्टींवर बोलताना सुरूवातीच्या दोन सामन्यांमधील झालेल्या चुका सांगितल्या. कोहलीच्या मते जर पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सुरूवातीच्या दोन ओव्हर चांगल्या झाल्या असत्या तर आज चित्र काही वेगळे असते. तो म्हणाला, टी-२०मध्ये अधिक अंतर नसते. जर तुम्ही सामन्याच्या सुरूवातीचे दोन ओव्हर अधिक जोशाने खेळता तर गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या. आम्ही पुरेसे साहस दाखवले नाही. आम्ही अशी टीम नाही आहोत जे टॉस हरल्याचा बहाणा बनवतील. 

विराट कोहलीने यास्पर्धेबाबत म्हटले, आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली. मला माहीत आहे की आम्ही वर्ल्डकपमध्ये खूप पुढे जाऊ शकलो नाही. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये आम्ही काही चांगले निकाल मिळवले. तसेच एकमेकांसोबत खेळण्याची मजा घेतली. टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिला सामना पाकिस्तानकडून १० विकेटने गमावला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्यांना ८ विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी