T20 World Cup 2021: टीम इंडियाने ५ प्रकारचा बॉल फेकणाऱ्या गोलंदाजाला कसे केले बाहेर?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2021 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तान आणिकप न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटच्या टी-२० वर्ल्ड संघावर सवाल उपस्थित केले जात आहेत. 

yuzvendra chahal
WC: भारताने ५ प्रकारचा बॉल फेकणाऱ्या बॉलरला कसे केले बाहेर? 
थोडं पण कामाचं
  • ताहिरने व्हर्च्युअल मीडियाशी बोलताना सांगितले, चहल चांगला गोलंदाज आहे.
  • इमरान ताहिरने सांगितले की लेग स्पिनर आपल्या गोलंदाजीने काही मिनिटांतच सामन्याचे फासे पलटू शकतो.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी स्पिनर इमरान ताहीरने(imran tahir) युझवेंद्र चहलला(yuzvendra chahal) सध्याच्या टी-२० वर्ल्डकप(t20 world cup) संघातून बाहेर ठेवण्यावर आश्चचर्य व्यक्त केले. इमरान ताहिरने सांगितले की लेग स्पिनर आपल्या गोलंदाजीने काही मिनिटांतच सामन्याचे फासे पलटू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी निवड समितीवरही प्रश्व उपस्थित केेजात आहे. चहलची निवड का केली गेली नाही असा सवालही केला जात आहे. why team india not select chahal for world cup, tahir asks

ताहिरने व्हर्च्युअल मीडियाशी बोलताना सांगितले, चहल चांगला गोलंदाज आहे. मला पर्सनली त्याला टी-२० वर्ल्डकपमध्ये पोहायचे होते मात्र त्याची निवड झाली नाही. लेग स्पिनर विविधतेने गोलंदाजी करतात. केवळ गुगली अथवा लेग ब्रेक नाही तर टॉप स्पिनर, फ्लिपर आणि स्लायडरही करतात.  लेग स्पिनर मोठी भूमिका निभावतात. फलंदाज आता तसे खेळू शकत नाही जसे १० वर्षांपूर्वी खेळत होते. श्रेय सर्व स्पिनर्स आणि फिल्डिंगला जाते. 

लेग स्पिनर ठरवतात विजय - इमरात ताहिर

न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोढीने रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात १७ धावा देत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या विकेट मिळवल्या. यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. ताहिरच्या मते एक लेग स्पिनर २-३ विकेट लवकर घेऊन सामन्याचे चित्र पलटू शकतो. 

चहलच्या जागी चाहरची निवड

लेग स्पिनर राहुल चाहरला युझवेंद्र चहलच्या जागी निवडण्यात आले मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधीही दिली गेली नाही. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारी प्रत्येक टीम स्पिनरसह मैदानात उतरत आहे. मात्र टीम इंडियाने दोनही सामन्यात स्पिनर्सना बाहेर ठेवले. पाकिस्तानकडे शादाब खान आहे. श्रीलंकेकडे वानेंदु हसारंगा,इंग्लंडकडे आदिल रशीद आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी