India Vs England: मैदानावर का झाले विराट-बेअरस्ट्रॉ यांच्यात भांडण? या गोष्टीवरून होती नाराजी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 04, 2022 | 14:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

India Vs England:भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुपरस्टार फलंदाज विराट कोहली आणि जॉनी बेअरस्ट्रॉ यांच्यात वाद झाला. आता बेअरस्ट्रॉने खुद्द याचा खुलासा केला की असे का घडले. 

kohli-bairstraw
मैदानावर का झाले कोहली-बेअरस्ट्रॉ यांच्यात भांडण? 
थोडं पण कामाचं
  • मोहम्मद शमीच्या बॉलवर विराट कोहलीने स्लिपमद्ये विराट कोहलने जॉनी बेअरस्ट्रॉचा शानदार कॅच पकडला.
  • बेअरस्ट्रॉने शानदार खेळी केल आणि तो १०६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
  • कॅच पकडल्यानंतर विराट कोहलीने त्याच्यावर राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडली नाही.

मुंबई: भारत आणि इंग्लंड(india vs england) यांच्यातील कसोटी सामन्यात खूपच रोमहर्षक खेळवला जात आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये भारतीय संघाने खूप शानदार खेळ केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली(virat kohli) आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्ट्रॉ(johny bairatraw) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याचा आता खुलासा झाला आहे. कोहली नेहमीच आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. why virat kohli and johny bairstraw arguement on field

अधिक वाचा - जान्हवी-न्यासा एकत्र लंच डेटवर

लाईव्हमध्ये झाली शाब्दिक बाचाबाची

जेव्हा इंग्लंकडून जॉनी बेअरस्ट्रॉ केवळ १३ धावांवर खेळत होता. तेव्हा विराट कोहलीने स्लेजिंग करण्याचे, ज्यामुळे त्याचे लक्ष इकडेतिकडे जाईल आणि भारतीय संघाला यश मिळेल. याचे जॉनी बेअरस्ट्रॉने त्याला उत्तर दिले. यानंतर स्टम्प माईकवर विराट कोहलीला ऐकवताना ऐकले गेले की मला नको सांगूस काय करायचे आहे. आपले तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर. 

कोहलीने घेतला शानदार कॅच

मोहम्मद शमीच्या बॉलवर विराट कोहलीने स्लिपमद्ये विराट कोहलने जॉनी बेअरस्ट्रॉचा शानदार कॅच पकडला. बेअरस्ट्रॉने शानदार खेळी केल आणि तो १०६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कॅच पकडल्यानंतर विराट कोहलीने त्याच्यावर राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडली नाही. यानंतर त्यांनी जॉनी बेअरस्ट्रला फ्लाईंग किस दिला. मैदानावर या दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. 

अधिक वाचा - दरीत कोसळली बस; 16 जणांचा जागीच मृत्यू,शाळकरी मुलंही बसमध्ये

का झाला मैदानावर वाद?

सामन्यानंतर जॉनी बेअरस्ट्रॉने खुलासा केला आहे की कोहलीने त्याला डिनरसाठी बोलावले नव्हते. यासाठी मैदानावर त्यांच्यात वाद झाला मात्र आता आमच्यात सगळं काही ठीक आहे. आम्ही दोघेही एकमेकांविरुद्ध गेल्या १० वर्षांपासून खेळत आहोत. आम्ही लवकरच एकत्र डिनर करताना दिसणार आहे. ययाबाबत कोणतीही चिंतेची बाब नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी