ऋषभ पंत मोडणार धोनीचा रेकॉर्ड, फक्त इतकं केल्यावर रचणार इतिहास

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 24, 2021 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh pant record: भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतकडे द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत धोनीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

rishabh pant
ऋषभ पंत मोडणार धोनीचा रेकॉर्ड, इतकं केल्यावर रचणार इतिहास 
थोडं पण कामाचं
  • एमएस धोनीने ३६ कसोटी सामन्यांमध्ये १०० विकेट घेण्याची कमाल केली होती
  • सध्या भारताकडून धोनीच्या नावावर सगळ्यात वेगवान १०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतने आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच प्रभावित केले.

मुंबई: टीम इंडियाचा विकेटकीपर(indian wicketkeeper) फलंदाज ऋषभ पंत(Rishabh pant) २६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा(ms dhoni) रेकॉर्ड मोडू शकतो. एक विकेटकीपर म्हणून पंतने २५ कसोटी सामन्यांमध्ये ९७ विकेटघेतल्या आहेत. सेंच्युरियनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत जर तो तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर सगळ्यात वेगवान १०० विकेट घेणारा तो भारतीय विकेटकीपर बनेल. Wicketkeeper rihabh pant can break ms dhoni record

धोनीने ३६ कसोटीत केला होता हा रेकॉर्ड

एमएस धोनीने ३६ कसोटी सामन्यांमध्ये १०० विकेट घेण्याची कमाल केली होती. पंत जर या पहिल्या कसोटी सामन्यात तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर धोनीपेक्षा १० कमी कसोटी सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड बनवेल. सध्या भारताकडून धोनीच्या नावावर सगळ्यात वेगवान १०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर वृद्धिमन साहा(३७) दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर किरण मोरे(३९), चौथ्या स्थानानवर नयन मोंगिया(४१) आणि पाचव्या स्थानावर सय्यद किरमानी(४२)चा नंबर लागतो. आता पंतकडे या सर्वांपेक्षा पुढे जाण्याची संधी आहे. 

ऋषभ पंतची गेल्या एका वर्षातील कामगिरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतने आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच प्रभावित केले. सिडनी कसोटी ड्रॉ करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतने कठीण काळात ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ब्रिस्बेनमध्येही त्याने विजयी खेळी केली होती.  ऋषभने या सामन्यात १३८ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा ठोकल्या होत्या आणि भारताला शेवटच्या दिवशी सामना जिंकून दिला होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. 

त्याच्या शानदार कामगिरीनंतर त्याला आयसीसीच्या प्लेयर ऑफ दी मंथ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. २०२१मध्ये पंतने ११ कसोटी सामन्यांमधील १९ डावांमध्ये ४१.५२च्या सरासरीने एकूण ७०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०१ अशी आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने अहमदाबादमध्ये ही खेळी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी