Vinod Kambli News: मुंबई वांद्रे पोलीसने(Bandra Police)भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात (Vinod Kambli)गुन्हा (FIR) दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया (Andrea Hewitt) हिच्या म्हणण्यानुसार, आयपीसी कलम 324 आणि 504 च्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद कांबळीवर पत्नी अँड्रिया हिला दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. (wife beaten with a frying pan; FIR filed against Vinod Kambli)
अधिक वाचा : भारतातील पहिली ट्रान्समेल गर्भवती; फोटो व्हायरल
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विनोद कांबळीने तव्याच्या हँडलने पत्नी अँड्रिया हिला मारहाण केली असल्याचा आरोप कांबळीच्या पत्नीने केला आहे. तव्याने मारल्यामुळे पत्नी अँड्रिया हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कांबळीच्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो शांत होण्याऐवजी अधिकच चिडला. यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे.
अधिक वाचा :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडे जाण्यापूर्वी कांबळीच्या पत्नीने मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचार घेतले. पत्नीच्या म्हणण्यानुसार, कांबळी दारूच्या नशेत घरी आला होता आणि तिला शिवीगाळ करू लागला. यानंतर त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्याने मारहाण केली.
अधिक वाचा : या सवयींमुळे होते कॅन्सरची लागण
मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरुद्ध त्याची पत्नी अँड्रियाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दारूच्या नशेत असताना कांबळीने तिला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.