Football Player Affair | आपल्या पत्नीच्या अपरोक्ष कित्येक दिवसांपासून अफेअर करणाऱ्या पतीचं बिंग अखेर फुटलं. पत्नीला कळू न देता हा ब्रिटीश फुटबॉल प्लेअर एका तरुणीवर लाखो रुपये उधळत होता. योगायोगाने एक दिवस तो आपला मोबाईल बेडवर विसरून बाथरूममध्ये अंघोळीला गेला आणि सगळा प्रकार पत्नीच्या लक्षात आला. मग पत्नीनं रुद्रावतार धारण करत त्याला चांगलाच धडा शिकवला.
ब्रिटनमधील थ्री लायन्स या फुटबॉल क्लबसोबत खेळणारा प्रसिद्ध खेळाडू सध्या त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. या फुटबॉल खेळाडूचा जीव एका तरुणीत गुंतला होता. आपलं लग्न झालं आहे याचा जणू त्याला विसरच पडला होता. अनेकदा तो दिवस अन् रात्र त्या तरुणीसोबत वेळ घालवत असे. आपण आपल्या टीमसोबत असल्याचं पत्नीला सांगून तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवत असे. अनेक रात्री वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र घालवल्या होत्या. या काळात त्याने आपल्या गर्लफ्रेंडवर जवळपास 53 लाख रुपये खर्च केले होते. या तरुणीनं त्याला भुरळ घातली होती आणि तिच्याशिवाय या खेळाडूला इतर काहीच सुचत नव्हतं. तिची प्रत्येक मागणी तो पूर्ण करत असे आणि तिचा एक शब्द खाली पडू देत नसे. आपल्या या ‘सिक्रेट’ रिलेशनशिपला गुप्त ठेवण्यातही तो यशस्वी झाला होता आणि गेल्या कित्येक महिन्यांच्या या नात्याचा त्याच्या पत्नीला संशयही आला नव्हता. मात्र या फूटबॉल प्लेअरची एक कृती भलतीच महागात पडली ज्यामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
हा खेळाडू आपला मोबाईल पत्नीच्या ताब्यात जाणार नाही, याची सतत काळजी घेत असे. मात्र एक दिवस गडबडीत असताना त्याने मोबाईल बेडवर ठेवला आणि अंघोळीसाठी तो बाथरुममध्ये गेला. यावेळी नेमका पत्नीनं त्याचा फोन घेतला आणि तपासला. त्याच्या चॅटमध्ये तिला एका तरुणीसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो दिसले. ते पाहून तिला चांगलाच धक्का बसला. फोटो काढल्याची तारीख अलिकडची होती आणि त्या तरुणीसोबतचे चॅटही आक्षेपार्ह होते.
या चॅट हिस्ट्रीतून तिला आपल्या पतीने तरुणीवर लाखो रुपये खर्च केल्याचंही समजलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गेल्या काही दिवसात तिच्या पतीनं गर्लफ्रेंडवर तब्बल 53 लाख रुपये खर्च केले होते. हे समजल्यावर पत्नीनं क्षणाचाही विलंब न लावता त्याला जाब विचारला. आपली चोरी पकडली गेल्यामुळे त्याची बोबडीच वळली आणि तो थातूरमातूर उत्तरं देऊ लागला. पत्नीनं त्याच्याशी ब्रेकअप केला आणि डिव्होर्स घेण्याच्या तयारीने घर सोडलं. या खेळाडूशी त्याच्या पत्नीने आता कायमचं नातं तोडलं आहे.
अधिक वाचा - Dinesh Karthik: दिनेश कार्तिक धोनीबद्दल असा काही बोलला की...
यापूर्वीदेखील या खेळाडूनं एका तरुणीशी अफेअर केलं होतं. ते उजेडात आल्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याला मोठ्या मनाने माफ करून पुन्हा संसाराला सुरुवात केली होती. मात्र यावेळी पत्नीनं त्याला माफ न करण्याचा निर्णय घेतला आहे.