T-20 world cup: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 26, 2021 | 17:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

हार्दिक पांड्या सध्या फलंदाज म्हणून टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ८ बॉलमध्ये ११ रन्स बनवले. 

hardik pandya
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही? 
थोडं पण कामाचं
  • क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी
  • हार्दिकच्या जागी शार्दूल ठाकूर चांगला पर्याय
  • ३१ ऑक्टोबरला पुढील सामना

दुबई: भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या(hardik pandya) पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) पहिल्या सामन्यात काही खास करू शका नाही. इतकंच नाही तर काहीही न करता हार्दिक पांड्या या सामन्यात दुखापतग्रस्त(injured) झाला होता. भारताचा पुढील सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) आहे. त्यााधी हार्दिकच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३१ ऑक्टोबरच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे मात्र तो प्लेईंग ११मध्ये निवडला जाणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. will hardik pandya will not play in match against new zealand

चाहत्यांसाठी मोठी बातमी

गेल्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी  न करणारा हार्दिक पांड्या सध्या फलंदाज म्हणून टी-२०मध्ये खेळत आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ८ चेंडूत ११ धावा केल्या. यावेळी वेगवान गोलंदाजांसमोर तो असहज दिसत होता. ययानंतर शॉट पिच बॉल त्याच्या खांद्यावर लागा होता. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की हार्दिकच्या स्कॅनचा रिपोर्ट आला आहे आणि दुखापत खूप गंभीर नाही. याशिवाय दोनसामन्यांमध्ये सहा दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरण्यास त्याच्याकडे वेळ आहे. 

पांड्याच्या जागी शार्दूलचा चांगला ऑप्शन

हार्दिक पांड्या काही काळापासून गोलंदाजी करत नाही आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाज म्हणून उतरवण्यात आले होते. या सामन्यात हार्दिक पांड्या काही खास कामगिरी करू शकला नाही. अशातच टीमचे संतुलन कायम राहण्यासाठी त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. शार्दूलने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. तो चेन्नईकडून खेळत होता. त्याने १६ सामन्यांमध्ये चेन्नईचे प्रतिनिधित्व केे. यात त्याने २५.०९च्या सरासरीने आणि ८.८०च्या इकॉनॉमी रेटने २१ विकेट मिळवल्या.  

पंतवर टांगती तलवार

गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खराब राहिली आहे. अशातच टीम इंडियाकडे असे २ विकेटकीपर आहेत जे त्याची जागा घेऊ शकतात. तसेच त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमधील खराब कामगिरीमुळे पाकिस्ताविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी