T20 World Cup 2022 Semifinal Race: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये प्रत्येक सामन्यांमध्ये होत असलेला ट्विस्ट आणि थरार पाहून क्रिकेटप्रेमींना (Cricket lovers)मजा येत आहे. प्रत्येक संघ आपला दमदार खेळ दाखवत आहे. ग्रुप-2 मध्ये सर्व संघांचा एक एक सामना बाकी आहे, मात्र कोणते दोन संघ उपांत्य फेरीत (semi-finals) पोहोचतील हे अजूनही स्पष्ट झालेले नाही? त्यात पाकिस्तानचं सेमी फायनल सामन्यात प्रवेश करणं हे कठिण वाटत होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल ह्या आशा परत पल्लवित झाल्या आहेत. सामन्यांचे समीकरण कसे बदलले आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (Will IND-PAK play the final match of T20 World Cup or will both teams get stuck in the semi-finals?)
अधिक वाचा : गर्लफ्रेंडशीच लग्न करायचे आहे मग लक्षात घ्या या 5 गोष्टी
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तान चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवानंतर चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचे 4 सामन्यांतून 5 गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.भारतीय संघ चार सामन्यांत 3 विजयांसह 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा शेवटचा सामना 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून 8 गुण घेत उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरू शकते.
अधिक वाचा : बिकिनी परिधान करुन 43 वर्षीय अभिनेत्रीने पाण्यात लावली आग
पॉईंट्स टेबलच्या या गणितामुळे भारतासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना करो वा मरो असाच आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहू शकते, अन्यथा उपांत्य फेरीत जाण्यासाठी त्यांना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून राहावं लागू शकतं.
Group-2 मधून जर टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र झाला, तर उपांत्य फेरीतील दुसरा संघ बनण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. असं केल्यास पाकिस्तानाला 6 गुण मिळतील. तसेच दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरुद्धचा शेवटचा सामना हरावा यासाठी पाकिस्तानलाही प्रार्थना करावी लागेल. कारण दक्षिण आफ्रिकेचे गुण हे केवळ पाच गुण राहतील आणि पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
गभारत आणि पाकिस्तान गट-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना गट-1 मधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांशी होईल. उपांत्य फेरीत आपला सामना जिंकल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांशी खेळताना दिसतील. असे झाले तर चाहत्यांसाठी ते चमत्कारापेक्षा कमी नसेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.