IND vs ENG: विराट कोहली आज अॅडलेडमध्ये तोडणार आपला वर्ल्ड रेकॉर्ड? फक्त इतक्या धावांची गरज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 12:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ज्या फॉर्मात आहे त्यावरून हे सांगितले जाऊ शकते की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड तोडू शकतो. टी20 वर्ल्डकपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे. 

virat kohli
कोहली अॅडलेडमध्ये तोडणार आपला वर्ल्ड रेकॉर्ड? 
थोडं पण कामाचं
  • कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपमच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे.
  • आता खिताब मिळवण्यासाठी त्यांचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
  • हा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर आज 10 नोव्हेंबरला रंगणार आहे.

मुंबई: टीम इंडियाचा(team india) जबरदस्त फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली(virat kohli) जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup-2022) सध्याच्या हंगामात जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. आता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. येथे आज त्यांचा सामना इंग्लंडशी(england) होत आहे. यातच विराटकडे एक वर्ल्ड रेकॉर्ड(world record) मोडण्याची संधी आहे. सगळ्यात खास बाब म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी कोणी नव्हे तर त्याने खुद्द बनवला होता. 

अधिक वाचा - India vs England Live Score, T20 World Cup Semi Final Live streaming: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात

अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपमच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता खिताब मिळवण्यासाठी त्यांचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर आज 10 नोव्हेंबरला रंगणार आहे. भारतीय संघाने सुपर 12 राऊंडच्या ग्रुप 2मध्ये टॉप राहताना सेमीफायनलमध्ये जागा बनवली. भारताने सुपर 12 राऊंडमध्ये केवळ एक सामना एक सामना गमावला आणि 4 सामने जिंकले. त्यांना एकमेव द. आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. 

आपलाच रेकॉर्ड तोडणार विराट?

सुपरस्टार फलंदाज विराट कोहली आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. ज्या फॉर्ममध्ये तो खेळत आहे. त्यावरून असे वाटते की कोहली पुन्हा एकदा इतिहास रचू शकतो. विराटने आतापर्यंतच्या टी20 वर्ल्ड कपमधील सध्याच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहे. त्याने 5 डावांमध्ये 3 वेळा अर्धशतक ठोकले आहे. त्याचा हा फॉर्म पाहता असे म्हटले जाऊ शकते की तो टी20 वर्ल्ड कप-2014 मध्ये बनवलेला रेकॉर्ड तोडू शकतो. 

सेमीफायनलमध्ये संधी

विराटने आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपच्या एकूण 5 डावांमध्ये एकूण 246 धावा केल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. टी20 वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे. त्याने बांगलादेशमध्ये झालेल्या  2013-14 टी20 वर्ल्डकपमध्ये 6 डावांत 319 धावा केल्यया होत्या. तेव्हापासून हा रेकॉर्ड अद्याप कोणी तोडलेला नाही. विराट खुद्द या रेकॉर्डपासून 74 धावा दूर आहे. सेमीफायनलमध्ये विराट कोहलीकडे हा आकडा गाठण्याची संधी आहे. 

अधिक वाचा - T20 World Cup 2022: अ‍ॅडलेडच्या मैदानात सेमीफायनलसाठी भारत-इंग्लंड आमने-सामने, जाणून घ्या कशी असेल मैदानाची स्थिती?

सूर्यकुमारही या यादीत

सूर्यकुमार यादवही या यादीत सामाविष्ट आहे. त्याने आतापर्यंत 5 डावांमध्ये एकूण 225 धावा केल्या आहेत. सूर्या तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर नेदरलँड्सने मॅक्स ओडोड आहे ज्याने 8 सामन्यात एकूण 242 धावा केल्या आहेत. दरम्यान, नेदरलँड्स या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. अशातच संधी विराट आणि सूर्यकुमार यादवकडे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी