T20 WC:पाकिस्तान घेणार का न्यूझीलंडकडून बदला? 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 26, 2021 | 19:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानने टीम इंडियाला हरवत आपल्या वर्ल्डकप अभियानाची दणक्यात सुरूवात केली. आता दुसऱ्या सामन्यात ते शारजाहमध्ये न्यूझींलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. 

pak
T20 WC:पाकिस्तान घेणार का न्यूझीलंडकडून बदला?  
थोडं पण कामाचं
  • आज शारजामध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी
  • रविवारी पाकिस्तानने भारताला हरवले होते

दुबई: पाकिस्तानचा(pakistan) संघ टी-२० वर्ल्डकपमधील(t-20 world cup) आपला दुसरा सामना मंगळवारी म्हणजेच आज शारजाच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) सामना खेळतोय. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडकडून बदला घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कारण न्यूझीलंडच्या संघाने काही दिवसांपूर्वीच अचानक पाकिस्तानचा दौरा रद्द करत माघार घेतली होती. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येईल. will pakistan beat new zealand in t-20 world cup match

पाकिस्तानने टीम इंडियाला हरवून वर्ल्डकप अभियानाची सुरूवात केली. २९ वर्षामनी वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवला. टी२० वर्ल्डकप रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास दोन्ही संघांदरम्यान ५ वेळा सामने झाले. यात पाकिस्तानने न्यूझीलंडला ३ वेळा हरवले. तर न्यूझीलंडला दोन सामन्यांत विजय मिळवला. 

बाबरने संघाला सांगितले आम्ही वर्ल्डकप जिंकायला आलोय

बाबर आझमच्या नेतृत्वात खेळत असलेल्या पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. आझमने भारताला हरवल्यानंतर ड्रेसिंग रुममद्ये आपल्या खेळाडूंना सांगितले की आम्ही केवळ येथे भारताला हरवण्यास आलेलो नाही तर वर्ल्डकप जिंकायला आलो आहे आणि हे विसरायचे नाही आहे. 

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचा राग

न्यूझीलंड संघाने नुकतेच पाकिस्तान पोहोचल्यानंतर सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत माघार घेतली होती. यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्डकप तयारीला झटका लागला आणि नंतर इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला. आझमने यानंतर दोन्ही संघांवर टीका करताना म्हटले होते की, पाकिस्तान नेहमीच खेळाच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो. मात्र बाकी संघ नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला हरवत पुन्हा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. 

बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आलेले कर्णधार बाबर आजमचे वडील आझम सिद्दीकीही दुबईच्या स्टेडिययमध्ये होते. सिद्दीकी यांनी स्टँड्समध्ये बसून महामुकाबल्याचा आनंद घेतला. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानच्यास संघाने विजय मिळवल्यानंतर सिद्दीकी खूपच भावूक झाले. आनंदाने त्यांना अश्रू अनावर झाले. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की बाबरचे वडील बसलेले आहेत आणि लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान, सिद्दीकी आपल्या हातांनी अश्रू पुसताना दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी