आता कसा आहे विराट कोहली, खेळू शकेल का पुढील मॅच? विराटच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 06, 2022 | 13:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Fitness Update: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे बाहेर बसलेला विराट कोहली पुढील सामना खेळू शकणार का? चेतेश्वर पुजाराने दिले अपडेट

virat kohli
आता कसा आहे विराट कोहली, खेळू शकेल का पुढील मॅच? 
थोडं पण कामाचं
  • भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा २०२२
  • कर्णधार विराट कोहली खेळू शकणार तिसरा कसोटी सामना?
  • कोहलीच्या फिटनेसबाबत चेतेश्वर पुजाराने दिले ताजे अपडेट

मुंबई: भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला(team india) मोठा झटका लागला होता. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली(virat kohli) पाठीच्या दुखापतीमुळे सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी हनुमा विहारीला(hanuma vihari) संघात सामील करण्यात आले आहे. मात्र विहारी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही आहे. आता सवाल हा आहे की विराट कोहली तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? जोहान्सबर्गच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळ संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराने विराट कोहलीच्या फिटनेसबाबत ताजी माहिती दिली.  will virat kohl play next test match against south Africa?

रोहित शर्मा आधीच बाहेर गेल्याने भारतीय संघ थोडा कमकुवत झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीलाही बाहेर बसावे लागले. याबाबत चेतेश्वर पुजाराला प्रश्न विचारला असता त्याच्या उत्तराने दिलासा मिळाला. पुजाराच्या माहितीनुसार पाठीमध्ये थोडेसे दुखणे असल्याने तो विराट दुसरी कसोटी खेळू शकला नाही मात्र आता त्याची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे. तो लवकरच पूर्ण फिट होईळ. 

चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांना सांगितले, अधिकृतरित्या मी याबाबत अधिक खुलासा करू शकत नाही की तो निश्चितपणे चांगल्या स्थितीत आहे. मला वाटतं तो लवकरच फिट होईल. पुजाराने पुढे सांगितले की कोहलीच्या फिटनेसबाबत अधिक माहिती टीमचे फिजिओ देऊ शकतात. 

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत बाहेर बसल्याने त्याच्या जागी लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलेआहे. राहुलने टॉसच्या वेळेस सांगितले होते की ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत विराट फिट होण्याची शक्यता आहे. 

भारताने 240 धावांचे लक्ष्य 

भारताने दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 240 धावांचे लक्ष्य दिले आहे. आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात डीन एल्गर 121 चेंडूत 46 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. त्याचवेळी रासी वेन ड्युसेनने 37 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. कीगन पीटरसनने 28 आणि अॅडम मार्करामने 31 धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विनने 1-1 बळी घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी