women premier league wpl 2023 date time schedule announced : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) 4 ते 26 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या महिला प्रीमियर लीगच्या मॅच मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियम, चर्गगेट आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ या दोन ठिकाणी होणार आहेत. पहिली मॅच गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन महिला टीममध्ये होण्याची शक्यता आहे. वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. । क्रीडा / क्रिकेटकिडा
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष अरुण धूमल यांनी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) संदर्भात माहिती दिली. महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत सोमवार 13 फेब्रुवारी 2023 रोजी लिलाव होणार आहे. याआधी रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय महिला टीम आणि पाकिस्तानची महिला टीम यांच्यात न्यूलंड्स केप टाऊन येथे महिला टी 20 वर्ल्ड कपची मॅच होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मॅच सुरू होणार आहे. आयसीसी महिला टी 20 क्रिकेट या प्रकारात टीम इंडिया चौथ्या स्थानावर तर पाकिस्तानची टीम सातव्या स्थानावर आहे.
महिलांच्या पाच टीमसाठी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) अंतर्गत लिलाव होणार आहे. हा लिलाव मुंबईत सोमवार 13 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. पाच टीमच्या मालकी हक्कांचे लिलाव करून बीसीसीआयने 4669.99 कोटी रुपये कमावले. यानंतर बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या प्रसारणाचे अधिकार (ब्रॉडकास्टिंग राइट्स) 951 कोटी रुपयांना विकले. यामुळे आयपीएल खालोखाल डब्ल्यूपीएल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टी 20 प्रीमियर लीग झाली.
महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) मुंबई इंडियन्स (एमआय), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), दिल्ली कॅपिटल्स (डीसी) या आयपीएलच्या टीम व्यतिरिक्त केपरी ग्लोबल होल्डिंग्स लखनऊ आणि अदानी स्पोर्टलाइन यांनीही टीमचे मालकी हक्क खरेदी केले आहेत. एकूण पाच टीम महिला प्रीमियर लीग खेळतील. या लीगसाठी 1500 महिला क्रिकेटपटूंची नोंदणी झाली आहे. कामगिरीच्या आधारे लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?
या संघांनी सर्वाधिक वेळा जिंकलीय बॉर्डर गावस्कर ट्रॉफी
लिलाव प्रक्रियेत खर्च करण्यासाठी प्रत्येक टीमच्या व्यवस्थापनाकडे 12 कोटी रुपयांचे बजेट आहे. प्रत्येक टीमला किमान 15 आणि कमाल 18 खेळाडू लिलावातून खरेदी करावे लागतील. लीगमध्ये 22 मॅच खेळवल्या जातील. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी टीम फायनल मॅच खेळेल. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळण्यासाठी लीगमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीममध्ये क्वालिफाय मॅच होईल. या मॅचची विजेती टीम फायनल खेळेल. ही नॉकआऊट मॅच असेल. पराभूत टीमचे यंदाच्या लीगमधील आव्हान संपेल.