WPL Auction 2023 : वुमन्स प्रीमिअर लीगचा लिलाव, स्मृती मंधाना, गार्डनर आणि स्कीवरला मिळाले 3 कोटींपेक्षा जास्त

Womens Premier League 2023 Auction, Smriti Mandhana, Ashleigh Gardner, Natalie Sciver get more than 3 Crore : वुमन्स प्रीमिअर लीग 2023 अर्थात डब्ल्यूपीएल 2023 साठी मुंबईत लिलाव प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या लिलावातून स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या 3 खेळाडूंना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. 

Womens Premier League 2023 Auction, Smriti Mandhana, Ashleigh Gardner, Natalie Sciver get more than 3 Crore
वुमन्स प्रीमिअर लीगचा लिलाव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वुमन्स प्रीमिअर लीगचा लिलाव
  • स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या 3 खेळाडूंना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटी रुपयांत खरेदी केले

Womens Premier League 2023 Auction, Smriti Mandhana, Ashleigh Gardner, Natalie Sciver get more than 3 Crore : वुमन्स प्रीमिअर लीग 2023 अर्थात डब्ल्यूपीएल 2023 साठी मुंबईत लिलाव प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या लिलावातून स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या 3 खेळाडूंना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटी रुपयांत खरेदी केले. तर अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.2 कोटी रुपयांत खरेदी केले. नताली स्कीवरला मुंबई इंडियन्सने 3.2 कोटी रुपयांत खरेदी केले.

स्मृती मंधाना, अॅशले गार्डनर, नताली स्कीवर या आतापर्यंतच्या लिलावात सर्वात मोठी बोली लागलेल्या खेळाडू ठरल्या. सर्वाधिक 3.4 कोटी रुपयांची बोली स्मृती मंधानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लावली. 

WPL : T20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या या भारतीय महिला क्रिकेटपटूंना झाला फायदा

यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला 2.6 कोटी रुपयांत तर गुजरात जायंट्सने बेथ मूनीला 2 कोटी रुपयांत खरेदी केले. मुंबई इंडियन्सने पूजा वस्त्रकारला 1.9 कोटी रुपयांत आणि हरमनप्रीत कौरला 1.8 कोटी रुपयांत खरेदी केले. 

border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

मुंबईत बीकेसीतील (Bandra Kurla Complex - BKC) जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) वुमन्स प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) अर्थात डब्ल्यूपीएल 2023 साठी लिलाव प्रक्रिया सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी