आजपासून सुरू होणार विमेन्स टी-२०चा शेवटचा हंगाम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 23, 2022 | 17:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Womens T20 Challenge 2022ची सुरूवात आज म्हणजेच २३ मे पासून होत आहे. मात्र हा महिला स्पर्धेचा शेवटचा हंगाम असेल. कारण पुढील वर्षी आयपीएलच्या धर्तीवर विमेन्स आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. 

womens cricket
आजपासून सुरू होणार विमेन्स टी-२०चा शेवटचा हंगाम 
थोडं पण कामाचं
  • स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील ट्रेलब्लेजर आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोवाज यांच्यात २०२२ महिला टी-२० स्पर्धेला सुरूवात होईल.
  • हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
  • यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणे एकूण चार सामने खेळवले जातील.

मुंबई: Womens T20 Challenge 2022 ला मिनी विमेन आयपीएल(Mini women ipl) म्हटले जाते. मात्र या वर्षी स्पर्धेचा हा शेवटचा हंगाम असेल. आतापर्यंत तीन वेळा विमेन्स टी-२० स्पर्धेचे(womens t-20 tournament)  आयोजन झाले आहे. मात्र २०२२मध्ये हा स्पर्धेचा शेवटचा हंगाम असेल. या मागे कारण हे आहे की आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षी महिला आयपीएलचे आयोजन होत आहे. यात ६ संघ भाग घेणार आहेत. Womens T20 Challenge 2022 will be last season

अधिक वाचा - या राशीच्या व्यक्ती आहेत सर्वात भाग्यवान

भारतात महिला क्रिकेटला या वर्षीच्या सुरूवातीला काही सकारात्मक बातम्या मिळाल्या जेव्हा बीसीसीआयने २०१२३पासून सहा संघ असलेल्या महिला आयपीएल सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. याचा अर्थ टी-२० स्पर्धा जी २०१८मध्ये एका सामन्यापासून सुरू झाली आणि  त्यानंतर २०१९ आणि २०२०मध्ये तीन संघाची स्पर्धा नली ते आपल्या शेवटच्या टप्प्यासाठी तयार आहेत. या हंगामातील पहिला सामना आज २३ मेला खेळवला जात आहे.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील ट्रेलब्लेजर आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोवाज यांच्यात २०२२ महिला टी-२० स्पर्धेला सुरूवात होईल. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळवला जाईल. यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणे एकूण चार सामने खेळवले जातील. यात तीन लीग सामने होतील आणि एक फायनल असेल. स्पर्धेचा दुसरा सामना सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी यांच्यात रंगेल. तर शेवटचा लीग सामना व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात रंगेल. 

Women Challenge T20मधील संघ

सुपरनोवा: हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुष सोनी, चंदू वी, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशि कनौजिया, सोफी एक्लेस्टोन, *सुने लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेज़र: स्मृति मंधाना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधति रेड्डी, * हेले मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका सिंह, ऋचा घोष, एस मेघना, सॅका इशाक, *सलमा खातून, *शर्मिन अख्तर, *सोफिया ब्राउन, सुजाता मलिक, एस.बी. पोखरकर.

व्हेलोसिटी: दीप्ति शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शेफाली वर्मा, अयाबोंगा खाका, के.पी. नवगिरे, *कॅथरीन क्रॉस, कीर्ति जेम्स, *लॉरा वोल्वार्ड्ट, माया सोनवणे, *नत्थाकन चँथम, राधा यादव, आरती केदार, शिवली शिंदे, सिमरन बहादुर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा.

अधिक वाचा - पाक सिंगरचा करण जोहरवर गाणे चोरल्याचा आरोप 

असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक

२३ मे संध्याकाळी साडेसात वाजता - ट्रेलब्लेझर वि. सुपरनोव्हा
२४ मे दुपारी साडेतीन वाजता - सुपरनोवा वि. व्हेलोसिटी
२६ मे संध्याकाळी साडेसात वाजता - व्हेलोसिटी वि ट्रेलब्लेझर
२८ मे संध्याकाळी साडेसात वाजता -फायनल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी